PM Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदी करा अर्ध्या किमतीत,शासन देतंय भरघोस सब्सिडीवर

PM Tractor Yojana: शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवित असते. अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, आणि शेतकऱ्यांना सुखी व सन्मानाने जीवन जगात यावे यासाठी शासन प्रयत्नशील असते. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी शासन शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामुग्री पुरविते. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांमार्फत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सबसिडी उपलब्ध करून दिली जाते. वेगवेगळ्या योजनेत शेतकऱ्यांना दिली जाणारी सबसिडी हि वेगवेगळी आहे. महाराष्ट्र शासनाकडून MAHADBT पोर्टल मार्फत लॉटरी पद्धतीने ट्रॅक्टर योजनेसाठी अनुदान दिले जाते. तसेच केंद्र शासनाकडून ही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. आज आपण PM Tractor Yojana काय आहे या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.PM Tractor Yojana

महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना दिली जाणारी ट्रॅक्टर अनुदान योजना

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शासन शेतकऱ्यांना आधुनिक औजारे आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देते. महाराष्ट्र शासनाकडून शेतकर्त्यांसाठी MAHADBAT या पोर्टल मार्फत आधुनिक औजारे आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी ४०% ते ५०% सबसिडी उपलब्ध करून दिली जाते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ओंलीने अर्ज करावा लागतो.

अर्ज केल्या नंतर तुम्हला लॉटरी पद्धतीने निवड करून कळविले जाते. एकदा अर्ज केल्या नंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळे पर्यंत नवीन अर्ज करण्याची गरज पडत नाही.

✅👉🏻 कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

PM Tractor Yojana

PM Tractor Yojana ही योजना केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून राबविली जात आहे. देशातील अल्पभूदारक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि शेतकऱ्याचे कष्ट कमी होऊन त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढावे, यासाठी शासन शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर ते ५० HP पर्यंत च्या क्षमतेचे ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देत आहे. देशातील शेतकरी साधन व्हावा हा उद्देश शासनाचा या योजने माघील आहे. या योजनेतून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान दिले जाते.

PM Tractor Yojana अंतर्गत ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या PM KISAN योजनेच्या पोर्टल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्या नंतर तुम्ही PM Tractor Yojana या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर अनुदानाचा फॉर्म भरावा लागेल. फॉर्म पूर्ण भरून शेवटी तो सबमिट करायचा आहे.

✅👉🏻 महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR

PM ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. लाभार्थ्यांचे आधार कार्ड
  2. लाभार्थ्यांचे रेशन कार्ड
  3. अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे असणाऱ्या जमिनीचा तपशील देण्यासाठी सात-बारा व नमुना ८ चा उतारा.
  4. लाभार्थ्यांचे बँक खात्याचे झेरॉक्स
  5. लाभार्थ्यांचे दोन पासपोर्ट साईज फोटो
  6. लाभार्थ्यांचे पॅन कार्ड
  7. लाभार्थ्यांचा चालू असलेला मोबाईल नंबर

इत्यादी कागदपत्रे PM Tractor Yojana च्या ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक असतात.

Conclusion

PM Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदी करा अर्ध्या किमतीत,शासन देतंय भरघोस सब्सिडीवरया लेखात आपण PM Tractor Yojana काय आहे, या बद्दल सविस्तर माहिती पहिली. शासनाकडून शेतकऱ्यांना सब्सिडीवर देण्यात येणारी PM Tractor Yojana ही अत्यंत लाभदायक योजना आहे.  माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

Scroll to Top