Ration Card Status: Maharashtra, रेशन कार्डची ऑनलाईन स्तिथी तपासा

Ration Card Status:- आपल्या दैनंदिन जीवनातील इतर कागद्पत्रा बरोबर Ration Card हे पण एक महत्वाचे कागदपत्र आहे, त्याच बरोबर शाशन Ration Card धारकांना कमी किमतीत किंवा मोफत अन्न पुरवठा करते. शासनाच्या अनेक योजनांसाठी तुम्हाला Ration Card आवश्यक असते. Ration Card शिवाय तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. ‘वन नेशन वन रेशन ‘ या शासनाच्या घोषणे प्रमाणे तुम्ही तुमच्या Ration Card च्या साह्याने भारतात कुठंही रेशन चा लाभ घेऊ शकता. त्यासाठी आता नवीन रेशन काढण्याची आवश्यकता राहिली नाही. Ration Card सुविधा हि पूर्णपने Online असल्यामुळे तुम्ही तुमच्या Ration Card विषयीच्या सुविधा कुठे पण मिळवू शकता. आज आपण Ration Card Status – रेशन कार्ड सद्य स्थिती कशी चेक करायची या बद्दल माहिती पाहणार आहोत.Ration Card Status

Ration Card/ रेशन कार्ड

शासनाने प्रत्येक गरीब कुटुंबाला रेशन चा लाभ भेटावं यासाठी समाजातील प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकांसाठी वेगवेगळया पात्रतेनुसार रेशन कार्ड  उपलब्ध करून दिले आहेत, जेणेकरून समाजातील प्रत्येक उपेक्षित घटक यामध्ये समाविष्ठ करता येईल. Ration Card चे खालील काही प्रकार आहेत.

  1. पिवळे रेशन कार्ड
  2. APL रेशन कार्ड
  3. केशरी रेशन कार्ड
  4. अंतोदय रेशन कार्ड
  5. शेतकरी रेशन कार्ड
  6. प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड

वरील प्रमाणे रेशन कार्ड महाराष्ट्रात शासन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.

✅👉🏻 कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

Ration Card/ रेशन कार्ड पात्रता व निकष

  1. लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
  2. दारिद्रय रेषेत नाव असल्यास प्राधान्य
  3. कुटुंबातील एकूण मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न कमीत कमी रु. १५००० ते जास्तीत जास्त रु. १,५०,००० याच्या दरम्यान असावे.
  4. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय शेवेत कार्यरत नसावी
  5. कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत नसावी
  6. कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन नसावे
  7. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड
  8. कुटुंब प्रमुखाचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  9. कुटुंब प्रमुखाचे पॅन कार्ड
  10. कुटुंबातील सदस्यांकडे दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी

✅👉🏻 महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR

How to check ration card status/ रेशन कार्ड स्थिती तपासा

ration card status चेक करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या https://mahafood.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्या नंतर सर्व प्रथम तुम्हाला पेज च्या उजव्या बाजूला असणाऱ्या ऑनलाईन  शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर जावे लागेल.

ऑनलाईन  शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर आल्या नंतर तुमच्या समोर नवीन वेब पेज ओपन होईल. या वेब पेज वर उजव्या बाजूने दिसणाऱ्या Singin/Rejister ला टच करून तुम्हाला Public Login हा पर्याय निवडायचा आहे. Public Login हा पर्याय निवडल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल.

ओपन झालेल्या नवीन पेज वर तुम्हाला New User! Sing Up Here  या पर्यायावर जायचे आहे. या पर्यायावर गेल्या नंतर ओपन होणाऱ्या पेज वर दिसणाऱ्या ३ पर्याय पैकी पहिल्या  I Have a Valid Ration Card या पर्यायावर टिक करायचे आहे. या पर्यायाला टिक करून त्या खालील रकान्यात तुमचा १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकल्या नंतर तुम्हाला Check ration card या बटनाला क्लिक करायचे आहे. या बटनाला क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या ration card ची सर्व डीटीएल ओपन होईल.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ration card चे status Check करता येईल

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

Ration card status/ RC Details Check

तुमच्या RC Details मिळविण्यासाठी तुम्ही शासनाच्या https://nfsa.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला वेब पेज वरील Citizen Corner या पर्यायावर जावे लागेल. त्या नंतर दिसणाऱ्या इतर पर्यायांमधून Know Your Ration Card Status या पर्यायाला क्लिक करावे लागेल.

Know Your Ration Card Status या पर्यायाला क्लिक केल्या नंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुम्हाला पहिल्या रकान्यात Search Type मध्ये तुम्हाला ration card No. निवडून पुढील रकान्यात तुम्हाला तुमचा १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या नंतर खालील रकान्यात दिसणारा कॅप्चा टाकून Get RC Details या बटनावर क्लिक करायचे आहे. या बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमचे Ration card status ओपन होईल.

वरती दिलेल्या दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमच्या Ration card चे status चेक करू शकता.

✅👉🏻 Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Conclusion

Ration Card Status: Maharashtra, रेशन कार्डचे असे करा Online Status Check या लेखात आपण Ration Card Status कसे चेक करायचे या बद्दल पूर्ण माहिती पहिली आहे. रेशन कार्ड विषयीच्या अनेक शेवा आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतो. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top