Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

विध्यार्थ्यांना देशा अंतर्गत आणि परदेशी शिक्षणासाठी अनेक संस्था कडून शिष्यवृत्ती कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अनेक विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती कर्ज योजना राबविली जाते. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी या योजना राबविल्या जातात. परदेशी शिक्षण घेणे हे प्रत्येक सर्वसाधारण विद्यार्थ्याला शक्य होत नाही, अशा विद्वान विद्यार्थ्याला  J. N. TATA ENDOWMENT मार्फत शिष्यवृत्ती कर्ज उपलब्ध करून दिले जाते. J. N. TATA ENDOWMENT कडून दिल्या जाणाऱ्या  Scholarship Loan चा लाभ आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आज आपण J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan योजना काय आहे, याचे पात्रता व निकष काय आहेत या बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.Scholarship Loan: जे.एन.टाटा एंडोव्हमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan/ जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज

टाटा समूहाकडून परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan/ जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज उपलब्ध करून दिले जाते. J. N. TATA यांनी १८९२ मध्ये या शिष्यवृत्ती कर्ज योजनेला सुरुवात केली. J. N. TATA ENDOWMENT हे भारतातील विद्यार्थ्यांना परदेशात उंचच शिक्षणासाठी मेरिट आधारित शिष्यवृत्ती कर्ज प्रदान करते. दरवर्षी विज्ञान, वाणिज्य, कला, आणि कायद्या विषयीचे शिक्षण घेणाऱ्या ९० ते १०० विद्यार्थ्यांना सदरील Scholarship Loan दिले जाते. या योजनेतून विद्यार्थ्यांना किमान रु. १ लाख ते कमाल रु. १० लाख पर्यंत Scholarship Loan दिले जाते.

J. N. TATA ENDOWMENT मार्फत देण्यात येणारे Scholarship Loan हे विद्यार्थ्यांना ७ वर्षाच्या मुदतीत देण्यात येते. आणि विद्यार्थ्याने तिसऱ्या आणि सातव्या वर्षाच्या दरम्यान पाच सामान टप्प्यात संपूर्ण रक्कम परत करणे अनिवार्य आहे. मिळणाऱ्या रकमेवर शून्य टक्के व्याज ( मुद्दल ) आकारले जाते.

✅👉🏻 सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

Scholarship Loan पात्रता व निकष पुढील प्रमाणे आहेत 

  • Scholarship Loan साठी अर्ज करणारा विध्यार्थी  भारतीय असावा.
  • लाभार्थ्यांचे वय 45 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
  • पदवी किंवा पद्वुत्तर अभ्यासात सरासरी किमान 60% गुण आवश्यक.
  • मान्यता प्राप्त विध्यापिठाचे पदवीधर असावे.
  • ज्या कोर्स मध्ये विध्यार्थ्याला प्रवेश दिला जातो, ते पदवीत्तर पदवी असावी.
  • ज्या उमेदवाराची मागील वर्षी निवड झाली नाही आणि ज्यांची निवड झाली पण शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही अशे लाभार्थी पुन्हा नव्याने अर्ज करू शकतात.
  • पदवी वर्षाच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विध्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan चा लाभ घेतलेले आणि शिष्यवृत्ती रक्कम परत केलेले विध्यार्थी परत Scholarship Loan साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • सेमिनार परिषदा,प्रशिक्षण कार्य शाळा,पेपर प्रेझेन्टेशन, अंडर ग्र्याजूएट,ऑनलाईन मध्येमातून पदवी प्राप्त करणारे विध्यार्थी या योजनेस पात्र राहणार नाहीत.
  • भारत मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे या योजनेस पात्र नाहीत.
  • उच्चं मध्येमील स्तरावरील विध्यार्थी एका वर्षाच्या डिप्लोमा करण्यासाठी अर्ज करत असतील तर ते पात्र नाहीत.

✅👉🏻 MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना

Scholarship Loan Process/ शिष्यवृत्ती कर्ज प्रक्रिया 

गुणवत्तेवर आधारित असलेली J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan योजना हि पूर्णवेळ पदव्युत्तर/ पीएच. डी./डॉक्टरेट परदेशात अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना दिली जाते.सर्व विषयामध्ये परिभाषित आणि पत्रात निकष पूर्ण जाणाऱ्या विध्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्ती कर्ज दिले जाते. अलीकडच्या काळात Scholarship Loan रक्कम किमान रु. 1 लाख ते  कमाल रु. 10 लाख करण्यात आली आहे. कमाल रकमेसाठी पत्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते.

या शिवाय शिष्यवृत्ती कर्ज रक्कम स्वीकारलेले निवडक विध्यार्थी हे tata त्रष्ट कडून निम्मे प्रवास अनुदान आणि भेटवस्तू पुरस्कारासाठी पात्र आहेत.

पोस्ट निवड प्रक्रिया

  • Scholarship Loan प्रत्येक टप्प्यातून गेलेल्या लाभार्थ्याला त्याच्या निवडी बद्दल जुलै महिन्याच्या मद्या पर्यंत e-mail द्वारे कळविले जाईल.
  • Scholarship Loan मंजूर झाल्यावर विध्यार्थ्याने त्याची स्वीकृती कळविणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याने कागदपत्रांच्या प्रती स्क्यान करून अपलोड करणे आवश्यक आहे.
  • एक हमीदार असणे आवश्यक आहे.

हमीदार :-

  • प्रत्येक उमेदवाराला एक हमीदार असणे आवश्यक आहे.
  • हमीदार हा पालक/ पती/पत्नी/नातेवाईक/रक्तातील नात्यातील व्यक्ती असू शकतो.
  • नाते सबंध नसेल व्यक्ती हमीदार करत असतांना एन्डॉवमेंट पूर्व परवानगी शिवाय आणि संबंधित कागदपत्रे सादर केल्या शिवाय हमीदार म्हणून काम करू शकत नाही.

हमीदार कागदपत्रे

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. पासपोर्ट फोटो
  4. उत्पन्नाचा पुरावा / नवीनतम दाखल केलेला ITR

उमेदवार ( विध्यार्थी ) कागदपत्रे

  1. विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र
  2. मागील वर्षाच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र
  3. स्कोअर कार्ड
  4. शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र ( रँकिंग )
  5. सह अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमोत्तर प्रमाणपत्रे
  6. संशोधन कार्य/प्रकल्प कार्य
  7. शिक्षणाचा होणार खर्च
  8. उत्पन्नाचे स्रोत

J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan-अर्ज कुठे करायचा

J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan साठी तुम्ही नोंदणी चालू असतांना पुढील वेबसाईट वर जावून अर्ज करू शकता. https://jntataendowment.org या साईटवर Online अर्ज तुम्हाला नोंदणी चालू असतांना करता येयील, तसेच Scholarship Loan विषयी इतर माहिती हि तुम्हाला याच वेबसाईट वर मळेल.

✅👉🏻 Construction Workers Educational Welfare Scheme Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

Conclusion

Scholarship Loan: जे.एन.टाटा एंडोव्हमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना या लेख मध्ये आपण J. N. TATA ENDOWMENT Scholarship Loan विषयी सविस्तर माहिती पहिली. या योजनेतून परदेशी शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी रु.1 लाख ते रु. 10 लाख पर्यंत Scholarship Loan उपलब्ध करून दिले जाते. या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नाही. हि मुद्दल रक्कम पाच ताप्पात परत करावी लागते. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना”

  1. Pingback: Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

Comments are closed.

Scroll to Top