Mahabocw In Renewal Status: www mahabocw नूतनीकरण स्थिती कशी तपासायची, संपूर्ण माहिती

Www Mahabocw In Renewal Status:- शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून कामगार हिताच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. कामगाराचा आर्थिक सामाजिक स्तर उंचवावा म्हणून सदरील मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगार मंडळाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कामगार मंडळाकडे कामगार म्हणून नोंदणी करावी लागते. नोंदणी नंतर तुम्हाला मंडळ १४ अंकी ऑनलाईन देते, त्या द्वारे तुम्ही मंडळाच्या इतर योजनांचा फायदा घेऊ शकता. मंडळाकडून अनेक आर्थिक लाभाच्या योजना कामगारांसाठी राबविल्या जातात. मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर दर १२ महिन्याला सदरील नोंदणी हि Renew करावी लागते. Renew केलेल्या नोंदणीची नूतनीकरण स्थिती  (Renewal Status) कशी तपासायची ते आपण पाहू.Www Mahabocw In Renewal Status

माझी नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/The Best Tips For Job

Www Mahabocw In Renewal: कामगार रिन्यूअल

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या ऑफिशियल वेबसाईट www.mahabocw.in वर जाऊन तुम्ही तुमची ऑनलाइन नोंदणी करू शकता. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मंडळाच्या नियमानुसार दर १२ महिन्याला आपली ऑनलाइन नोंदणी renew करावी लागते. तुम्ही कामगार म्हणून सद्यस्थितीत काम करत आहात, हे Renew द्वारे कामगार मंडळाला माहिती द्यावी लागते. Renew करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ते आपण पुढे पाहू.

आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme

Mahabocw Online Renewal Process/असे करा ऑनलाईन रिन्यू

कामगार मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर कामगाराला नोंदणी केल्यानंतर ती नोंदणी दर १२ महिन्याला renew करावी लागते. Renew करण्यासाठी काय करावे लागते ते आपण पाहू.

सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या www.mahabocw.in या वेबसाइटवर जावे लागेल. साइटवर गेल्यानंतर Construction Worker Online Renewal या पर्यायाला निवडावे लागेल. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक बॉक्स दिसेल. त्या बॉक्समध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील New Renewal आणि Update Renewal  नवीन रिन्यूसाठी तुम्हाला New Renewal हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर Proceed To Form वर क्लिक करायचे आहे.

Proceed To Form क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP येईल, ती भरून तुमचा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्मवर तुम्हाला इतर माहिती भरून तुमच्या जवळील ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अपलोड केल्या केल्यानंतर खाली कागदपत्रे पडताळणीची तारीख निवडावी लागेल. निवडलेल्या तारखेला जवळच्या कामगार कल्याण जाऊन कागदपत्रे तपासून घ्यावी लागतील. तुमची रिन्यूची प्रोसेस पूर्ण होताच, तुम्हाला SMS द्वारे कळवले जाईल. पुढील ७ दिवसात तुमचे रिन्यूअल पूर्ण होईल. रेन्युअलमध्ये काही त्रुटी असल्यास त्या तुम्हाला SMS द्वारे किंवा तुमची प्रोफाइल लॉगिन केल्यानंतर दिसून येतील.

Renewal करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कामगारांचे १४ अंकी रेजिस्टेंशन नंबर (कार्ड).
  • आधार कार्ड.
  • ९० दिवस कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र.

Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Www Mahabocw In Renewal Status: कामगार रिन्यूअल स्थिती चेक करा

कामगार विभागाच्या mahabocw.in या वेबसाइटवर रिन्यू केल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी रिन्यू झाली किंवा नाही हे पाहता येते. तुम्ही रिन्यू केल्यानंतर महामंडळाकडून तुम्हाला SMS द्वारे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर कळवले जाते.

Renewal Status चेक करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या Construction Worker Profile Login (प्रोफाइलवर लॉगिन) करावे लागेल. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर येणारी OTP भरून तुमची प्रोफाइल ओपन होईल. तुमच्या प्रोफाइलवर तुमचे नाव आणि इतर माहिती असते, त्याचबरोबर Acknowledgement Number आणि Registration Number असतो.

Construction Worker: Profile Login केल्यानंतर प्रोफाइल फॉर्मवर Renewals म्हणून पर्याय येतो त्याला क्लिक करताच तुम्ही तुमचे Renewal Status पाहू शकता. रिन्यूअलचा  पिरियड पूर्ण झाला नसेल किंवा काही त्रुटी असल्यास Renewals Status मध्ये तुम्हाला दिसून येईल. रेन्युअल दर 12 महिन्याला करावे लागते, तुमच्या रेन्युअलची तारीख तुमच्या प्रोफाईलवर असते. तुमचे रेन्युअल झालेले असल्यास Status हिरव्या रंगात Active म्हणून दिसते. (Www Mahabocw In Renewal Status)

महिला कर्ज योजना: शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात

Conclusion

Mahabocw In Renewal Status: www mahabocw नूतनीकरण स्थिती कशी तपासायची, संपूर्ण माहिती या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Online Renewal Status कसे चेक करायचे ते सविस्तर सांगितले. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील चेक करू शकता. कामगार विभागाच्या नोंदणीनंतर दर १२ महिन्याला नोंदणी रिन्यू करावी लागते. नोंदणी रिन्यू केल्या नंतर www mahabocw नूतनीकरण स्थिती कशी चेक करायची याची सविस्तर माहिती आपण या blog मध्ये पहिली आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास शेअर करा.

हे ही वाचा :

आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top