आरोग्यदूत: वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत निवडले जाणार प्रत्येक गावात दोन आरोग्यदूत

आरोग्यदूत:- निरोगी समाज निर्माण करण्यासाठी वेल्फेअर फाउंडेशन दिल्ली हे काम करते. गावातील लोकांना आरोग्य विषयीच्या समस्या समजावून सांगून त्यावर उपाय योजना करण्यासाठी प्रेरित करणे आणि वेल्फेअर फाउंडेशन मार्फत मदत करणे या उद्देशाने वेल्फेअर फाउंडेशन हे सदरील योजना राबवीत आहे. या योजनेतून गावातील सुशिक्षित आणि समाज कार्याची आवड असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत जोडणे आणि गावात निरोगी समाज घडवून आणणे या उद्देशाने मानधन तत्वावर एका गावात दोन आरोग्यदूत निवडणे आहे.आरोग्यदूत

आरोग्यदूत: वेल्फेअर फाउंडेशन

आरोग्यदूत वेल्फेअर फाउंडेशन हे भारतभर आरोग्य विषयी जनजागृती करते. समाजातील लोकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी वेल्फेअर फाउंडेशन विशेष प्रयत्नशील आहे. सदरील वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत प्रत्येक गावात मानधन तत्वावर दोन आरोग्यदूत नेमले जाणार आहेत. जे नागरिकांच्या आरोग्य विषयीच्या समस्यावर काम करतील, आरोग्य विषयी जनजागृती निर्माण करतील, आणि आरोग्यदायी सवयी विषयी शिक्षित करतील.

निवडलेल्या ल्भार्थ्यांना वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षित आरोग्यदूत गावात नियुक्त केले जाणार आहेत. निवड प्रक्रियेत महिलांना 33% आरक्षण दिले जाणार आहे. एका गावात एक पुरुष तर दुसरी महिला यांची निवड केली जाणार आहे.

आरोग्यदूत पात्रता

  • लाभार्थी किमान 10 वी पास असावा.
  • आरोग्यदूतसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याला समाज कार्याची आवड असावी.
  • प्रत्येक गावात एक पुरुष एक महिला उमेदवार निवडले जातील.
  • अर्जाच्या तारखे नुसार अर्जदाराचे वय किमान 18 ते 50 या दरम्यान असावे.
  • अर्जदाराकडे स्वतः चा मोबाईल आणि दुचाकी असणे आवश्यक आहे.

आरोग्यदूत यांना मिळणारा लाभ

निवड झालेल्या लाभार्थ्याला मासिक 12,500 वेतन आणि 10 लाख रुपयाचा अपघात विमा मिळणार आहे. तसेच समाजात सेवा करण्याची संधी मिळणार आहे, ज्या द्वारे समाजात एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याची संधी आरोग्यदूत या योजनेतून मिळणार आहे.

आरोग्यदूत ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • सर्वप्रथम तुम्हाला आरोग्यदूत वेल्फेअर फाउंडेशन यांच्या अधिकृत वेबसाईट https://arogyadut.org वर जावे लागेल. वेबसाईट वर आल्या नंतर समोर दिसणाऱ्या पोर्टल वर REGISTRATION या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नवीन पेज वरती स्वतः ची माहिती नाव इमेल, मोबाईल नंबर, पत्ता इत्यादी माहिती भारायाचिया आहे.
  • खालील भागात अपंग असल्यास माहिती न्हारायाचिया आहे.
  • नंतर शिक्षण विषयीची माहिती भरायची आहे.
  • संगणकाचे ज्ञान असल्यास ती माहिती भारायाचि आहे.
  • खाली लाभार्थ्याला त्याचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे.
  • स्वयं घोषणा याला टिक मार्क करून स्वतः चे खाते असणाऱ्या बँकेचा तपशील भरायचा आहे.
  • आणि शेवटी दिलेल्या कोड ला स्क्यान करून 950 रुपये पेमेंट करायचे आहे, आणि तुमचा UTR क्रमांक टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.

अशा सोप्या पद्धतीने तुमचा ऑनलाईन फॉर्म सबमिट होईल.

आरोग्यदूत निवडप्रक्रिया

सदरील योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. परीक्षा पास झाल्या नंतर लाभार्थ्याला प्रशिक्षणासाठी बोलाविले जाईल त्यासाठी लाभार्थ्याने स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. प्रशिक्षन चालू असतांना कुठला ही भत्ता दिला जाणार नाही. परीक्षे नंतर पुढील कार्यवाहीस 180 दिवसाचा कालावधी लागतो.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 आहे. ( बऱ्याच ठिकाणी माहिती नसल्यामुळे अर्ज भरले गेले नाहीत, त्यामुळे सदरील तारीख वाढू शकते.).
  • आरोग्यदूत उमेदवारासाठी ऑनलाईन परीक्षेची तारीख 25 मार्च 2025 ही आहे.
  • निवडलेल्या लाभार्थ्यांचे प्रशिक्षण आणि नियुक्ती परीक्षे नंतर 180 दिवसांनी होईल.

अधिक माहितीसाठी आरोग्यदूत वेल्फेअर फाउंडेशन च्या पोर्टल ला भेट द्या:- https://arogyadut.org

सारांश

आरोग्यदूत: वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत निवडले जाणार प्रत्येक गावात दोन आरोग्यदूत या लेखात आपण आरोग्यदूत निवड आणि ऑनलाईन अर्ज या विषयी सविस्तर माहिती पहिली. वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत प्रत्येक गावात आरोग्यदूत निवडले जाणार आहेत. गावातील समाजकार्याची आवड असणाऱ्या तरुणांना ही एक चांगली संधी आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

हे ही वाचा :-

  1. Best Student Loan App: विध्यार्थ्यांना झटपट कर्ज उपलब्ध करून देणारे 10 App
  2. Best Bike Back Pain: प्रवास करतांना पाठदुखीचा त्रास होऊ नाही, यासाठी निवडा सर्वोत्तम बाईक
  3. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025-2026 (MAHADBT): 100% अनुदानावर चार्गिंग पंपासाठी असा करा अर्ज
  4. महाराष्ट्र ट्रॅफिक चलान: तुमच्या वाहनाचे ई-चलान कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत
  5. शेतकरी ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
  6. उद्योगिनी योजना: महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 30% अनुदानावर बिनव्याजी कर्ज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top