जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना: छोट्या उद्योगांना कर्ज भांडवल योजना

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना:- महाराष्ट्र शासन मोठ्या उद्योगान बरोबरच छोट्या उद्योजकांना हि त्यांच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी कर्ज निर्माण करून देते. राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात छोट्या व्यावसायिकांची संख्या भरपूर आहे. एखादा छोटा व्यवसाय उभ करायचा म्हटलं तरी त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. मग अशा वेळेस छोट्या व्यावसायिकांची अडचण निर्माण होते, अशा लहान व्यावसायिकांना मदतीचा हात महाराष्ट्र शासन जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेच्या माद्येमातून देते. स्वतः चा एखादा छोटा व्यवसाय उभा करण्याची ज्यांची इच्छा आहे अशा लाभार्थ्याने सदरील योजनेस अर्ज केल्यास त्याला शासन भांडवल उभे कारण्यास मदत करते. आपण जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना या महाराष्ट्र शासनाच्या योजने बद्दल जाणून घेणार आहोत. कोणती कागदपत्रे लागतात, पात्रता काय आहे, अर्ज कुठे करायचा हे पुढे पाहणार आहोत.जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना

ग्रामीण व शहरी भागात छोट्या उद्योगांना आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना भांडवल निर्माण करून देणे आणि विकास साधणे. यातून रोजगारसंधी निर्माण होतील व स्वयंरोजगार निर्माण होऊन बेरोजगारांनच्या हाताला काम मिळेल. या उद्देशाने  जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आली आहे. ही योजना जिल्हास्तरावरील योजना असून जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत राबविली जाते. या योजनेसाठी छोटे उधोग उभे करण्याचे स्वप्न पाहणारे बेरोजगार अर्ज करू शकतात. हि अर्ज प्रक्रिया तुमच्या जिल्हा स्तरावरील जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत पूर्ण केली जाते. तुम्हाला या कार्यालयाला अर्ज करावा लागतो.

✅👉🏻 अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना पात्रता व निकष

  • सदरील योजनेस अर्शिज करण्यासाठी शिक्षणाची व वयाची अट नाही.
  • तुम्ही उभारत असलेला उद्योग, लघु उद्योग MSME नोंदणीस पात्र असावा.
  • उभारत असलेल्या उद्योगामधील यंत्रसामुग्री गुंतवणूक ₹ 2 लाखाच्या आत असावी.
  • उद्योग उभा करत असलेल्या  लोकवस्ती ची लोकसंख्या हि किमान 1 लाख असावी  (१९८१ प्रगणणे नुसार).
  • अगोदर पासून अस्तित्वात असलेल्या  उद्योगाचा विस्तार करण्यासाठीही या योजनेचा लाभ घेता येतो.

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेस आवश्यक कागदपत्रे

  1. विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज.
  2. उद्योग सेवा केंद्र नोंदणी किंवा MSME ( उद्योग आधार ) नोंदणी आवश्यक.
  3. जागा भाड्याने असेल तर जागा मालकाचे संमतीपत्र.
  4. जागेचा नमुना न. 8 उतारा/ भाडे पावती.
  5. ग्रामपंचायत/नगरपालिका नाहरकत प्रमाणपत्र.
  6. अनु. जाती/ अनु. जमाती च्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
  7. परिपूर्ण भरलेला प्रकल्प अहवाल.

✅👉🏻 लघु उद्योग लिस्ट मराठी : ग्रामीण व शहरी भागात करता येणारे लघु उद्योग

कर्ज मंजुरी प्रक्रिया

  1. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजने अंतर्गत अर्ज जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करावा लागतो.
  2. सदरील योजना राष्ट्रीय आणि सहकारी बनके मार्फत राबविली जाते.
  3. परिपूर्ण तयार असलेल्या अर्जा नुसार जिल्हा उद्योग केंद्राकडून सदरील बँकेस कर्जासाठी शिफारस करण्यात येते.
  4. बँकेने कर्ज मंजूर केल्या नंतर जय मालमत्तेवर कर्ज मंजूर करण्यात आले आहे ती मालमत्ता तारण धरून जिल्हा उद्योग केंद्राकडून मर्जीन मनी मजूर करण्यात येते.

संपर्क कार्यालय

जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा कार्यालय

अर्ज कसा करायचा

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय  या पोर्टल वर जावून तुम्ही योजनेची आणखी माहिती घेवू शकता, तसेच या site वरून योजनेसाठीचा अर्ज डाऊनलोड करून तो अर्ज परिपूर्ण भरून आपल्या जिल्हा उद्योग केंरावर नेवून द्यायचा आहे.

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी लागणारा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

✅👉🏻 PMEGP उद्योग लिस्ट pdf: PMEGP अंतर्गत करता येणाऱ्या उद्योगांची यादी

Conclusion

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना: छोट्या उद्योगांना कर्ज भांडवल योजना या लेखात आपण महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजने बदल माहिती पहिली आहे. छोट्या उद्योजकांना भांडवल उभारणीसाठी शासन सदरील योजनेतून आर्थिक साह्य करते. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना: छोट्या उद्योगांना कर्ज भांडवल योजना”

  1. Pingback: ग्रामीण भागातील व्यवसाय: ग्रामीण भागात करता येणारे उद्योग व्यवसाय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top