पीएम सूर्यघर योजना: मीटर वीजबिलाची चिंता सोडा, केंद्र सरकारची नवीन योजना अर्ज सुरु

केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी पीएम सूर्यघर योजना सुरु केली आहे. या योजनेतून सर्वसामान्यांना भेडसावत असलेली मीटर वीजबिलाची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेतून सर्व सामान्यांना दर महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत मिळणार आहे . छतावरील सौर पॅनल द्वारे वीजनिर्मिती करून सर्वसामान्यांना वीज वापरता येणार आहे . त्यामुळे साहजिकच येणाऱ्या वीजबिलात कपात होणार आहे. पंतप्रधानांनी सदर योजनेची घोषणा केली आहे. येत्या काळात प्रत्येक छतावर सौर पॅनल बसवण्याचा शासनाचा उद्देश आहे. सौर पॅनल  द्वारे होणाऱ्या वीजनिर्मिती मधून विजेवरील अतिरिक्त भार कमी होणार आहे, त्या बरोबरच सर्व सामान्यांना हि वीजबिलापासून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे. सदरील योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आलेले आहे.पीएम सूर्यघर योजना

पीएम सूर्यघर योजना

पीएम सूर्यघर योजनेतून सर्वसामान्यांची  वीजबिलाची चिंता मिटणार आहे. शासन सदरील योजनेतून छतावर सौर उर्जा पॅनल बसवून देणार आहे. सौर उर्जा पॅनल मधून निर्माण होणाऱ्या विजेद्वारे स्वतः चे वीजबिल कमी होणारच आहे, त्याच बरोबर त्यामधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज लाभार्थ्याला विकता येणार आहे. त्यामुळे या योजनेतून उत्पन्नाचे साधन देखील निर्माण होणार आहे. सरळ लाभार्थ्याला लाभ असल्याने या योजनेतून मिळणारे अनुदान हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

पीएम सूर्यघर योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या छताच्या क्षेत्रफळानुसार सौर उर्जा पॅनल बसविण्यात येणार आहे. या सौर पॅनलद्वारे निर्माण होणाऱ्या विजेतून तुमची स्वतः ची लागणारी विजेची गरज भागवून उर्वरित वीज ग्राहकाला विकून त्यापासून तुम्ही आर्थिक उत्पन्न कमवू शकता. लाभार्थ्याला फुकट वीज त्याच बरोबर रोजगार मिळावा हा केंद्र शासनाचा उद्देश आहे. यातून रोजगाराची निर्मिती होवून बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. आणि विजेवरील अतिरिक्त भार कमी होऊन विजेची बचत होईल. अक्षय ऊर्जेद्वारे देशाची उर्जेची गरजआपण पूर्ण करू शकू अशी धारणा शासनाची आहे.

पीएम सूर्यघर योजनेची अंमलबजावणी

पीएम सूर्यघर योजनेची अमल बजावणी हि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या National Portal for Rooftop Solar या पोर्टल द्वारे भरत सरकारच्या नवीन आणि नवीनीकरण उर्जा मंत्रालय यांच्या मार्फत राबविली जाणार आहे. ‘PM-SURYA GHAR: MUFT BIJLI YOJANA’  या National Portal वर लाभार्थ्यांनी अर्ज करायचे आहे. अएज करत असतांना आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत असावयास हवीत, त्यामध्ये तुमच्या घराची कागदपत्रे, आधार कार्ड, तुमच्या बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रे लागू शकतात.

पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज कसा करायचा

केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजने अंतर्गत Online पोर्टलद्वारे अर्ज करायचा आहे. या योजनेतून लाभार्थ्याला स्वतः च्या छतावर सौर उर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे. छताच्या एकूण लांबी-रुंदी नुसार सौर उर्जा पॅनल तुम्ही बसवू शकता. स्वतः किती गुंतवणूक करू शकता हे तुम्हाला पोर्टल वर भरायचे आहे. शासनाचे येणारे अनुदान सरळ लाभार्थ्याच्या खात्यावर येणार आहे. शासन देत असलेल्या एकूण अनुदाना व्यतिरिक्त ची काही रक्कम तुम्हाला टाकावी लागणार आहे. सौर उर्जा पॅनल च्या क्षेत्रफळा नुसार होणाऱ्या एकूण रकमेच्या काही अंशी रक्कम भरावी लागू शकते.

पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज

केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेसाठी तुम्हाला सर्वप्रथम National Portal for Rooftop Solar या पोर्टलवर जायचे आहे. या पोर्टलवर आल्यावर तुम्हाला Aplly for Rooftop Solar वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून otp द्वारे Login करायचे आहे. login केल्या नंतर तुमच्या समोर नवीन फॉर्म open होईल तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे. फॉर्म पूर्ण भरणे झाल्यावर Save & Next वर क्लिक करायचे आहे.

पहिला फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर Save & Next वर क्लिक केल्यानंतर दुसर्या पेज वर विचारलेली माहिती भरून, विचारलेले कागदपत्रे upload करायचे आहेत.

तिसर्या फोरमवर तुम्हाला ज्या कंपनी कडून सौर उर्जा पॅनल घ्यायचे आहे ते निवडून आणि इतर माहिती बरोबर भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.

पीएम सूर्यघर योजना Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Conclusion

पीएम सूर्यघर योजना सदरील योजने विषयी माहिती आपण या लेखातून पहिली. या लेखाच्या मदतीने तुम्ही सदरील योजनेचा लाभ घेऊ शकता. केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर योजने तुन सर्वसामान्यांना त्यांच्या वीजबिलात कपात करता येणार आहे त्याबरोबरच या योजनेतून अतिरिक्त निर्माण होणारी वीज विकून उत्पन्न हि मिळवता येणार आहे. आम्ही नेहेमीच अशा नवनवीन योजनेची माहिती आपल्या पर्यंत पोहचवीत असतो, अशा नवीन योजनांसाठी आमच्या सोशल ग्रुप मध्ये सामील व्हा. माहिती आवडली असल्यास आम्हाला फॉलो करा. आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि माहिती आपल्या मित्रांना शेअर करा.

आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top