पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना: रु. १ लाख ते २५ लाखापर्यंत अर्थसाह्य

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना- महिला नेतृत्व असणाऱ्या प्रकल्पांना बऱ्याच अडी-अडचणींना सामोरे जावे लागते. एखादा नवीन प्रकल्प उभा करायचा म्हटलं तर जागा, लागणारे कुशल मजूर, भांडवल या सारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. ग्रामीण तसेच शहरी भागात महिलांच्या नेतृत्वात स्टार्टअप उभेराहत असेल तर यातून इतर महिलांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. स्टार्टअप विकासाद्वारे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होते. शासन याच धर्तीवर महिलांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देत आहे. या आर्थिक पाठबळातून महिलांना नेतृत्वाची संधी निर्माण होत आहे. आज आपण ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ‘ काय आहे, या योजनेची पात्रता काय आहे, या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना: रु. १ लाख ते २५ लाखापर्यंत अर्थसाह्य

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपसना प्रारांभीक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना सुरु केली आहे. ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ‘ या योजनेतून महिला स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ निर्माण करून देण्यासाठी रु. १ लाख ते २५ लाखापर्यंत आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

✅👉🏻 mahajyoti tab registration 2024:2026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची उद्दिष्टे

  • महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे.
  • राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना
    व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करणेसाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे.
  • राज्यातील महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे.
  • देशातील अर्वाधिक महिला स्टार्टअप्सना असल्याची ओळख महाराष्ट्राची निर्माण करणे.
  • महिला स्टार्टअप्सना च्या मध्येमातून रोजगाराला चालना देऊन राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
  • या योजनेतील २५% रक्कम हि मागासवर्गीय महिला आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलां साठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
  • राज्यातील स्टार्टअप्सना यांच्या उलाढाली नुसार रु. १ लाख ते २५ लाख अर्थसाह्य प्रदान करण्यात येणार आहे.

✅👉🏻 माझी लाडकी बहीण योजना Online: अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची पात्रता

  • शासन मान्य महिला नेतृत्वातील स्टार्टअप.
  • सादर योजने मध्ये किमान ५१% वाटा महिला संस्थापक/सह संस्थापक यांचा असायला पाहिजे.
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एका वर्षांपासून कार्यरत असावा.
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअपची उलाढाल वार्षिक किमान रु. १० लाख ते १ कोटी पर्यंत असावी.
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोट्याही योजनेतून अनुदान घेतलेले नसावे.

✅👉🏻मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: शेवटच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली हि योजना कशी आहे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी कुठे करायचा अर्ज

सदरील योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यता सोसायटीच्या https://www.msins.in/ या वेबसाईटवर निशुल्क पद्धतीने अर्ज करता येतो.

कागदपत्रे

  1. अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव.
  2. कंपनी नोंदणी प्रमाणपत्र MCA , DPIIT मान्यता प्रमाणपत्र.
  3. कंपनीच्या जागेचा पुरावा.
  4. नाहरकत प्रमाणपत्र.
  5. वैयक्तिक इतर कागदपत्रे.

Conclusion

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना: रु. १ लाख ते २५ लाखापर्यंत अर्थसाह्य या लेखात आपण महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना बद्दल माहिती पहिली. या योजनेणूतून महिला स्टार्टअपना नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी शासन नवीन संधी उप्लब्धकरून देत आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशलमिडीया ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या पाहाल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top