प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना : असंघटीत कामगारांना 3000 हजार रुपये पेन्शन

केंद्र सरकारकडून भारतातील असंघटीत कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बऱ्याच योजना राबविल्या जातात. असंघटीत कामगाराच्या वृधापकाळाच्या सुरक्षेसाठी शासन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना राबवीत आहे. या योजने द्वारे कामगाराचे वृद्ध अवस्थेतील आयुष्य सुखकर व्हावे, त्यांना उतार वयात सुखाने जगता यावे हा उद्देश शासनाचा या माघचा आहे. वृद्ध अवस्थेत कामगार मजुरी करू शकत नाही, मग अशा वेळेस त्याच्या उदरनिर्वाहासाठी सदरील योजनेतून शासन कामगाराला मासिक वेतन स्वरुपात मदत करते. सदरील योजनेतून कामगाराला थोडीसी गुंतवणूक करून त्याच्या पुढील आयुष्याची सोय करता येते. या योजनेद्वारे शासन असंघटीत कामगाराला मासिक मानधन स्वरुपात निधी देते. आपण या योजने विषयी जाणून घेणार आहोत, या योजनेचे निकष आणि पात्रता काय आहेत हे पाहणार आहोत.प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना काय आहे

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत देशातील असंघटीत म्हणून काम करणाऱ्या कामगारांना वृधाप्काळात पेन्शन म्हणून मासिक रक्कम दिली जाते. या योजनेत भाग घेणाऱ्या लाभार्थ्याला राष्ट्रीयकृत बँक शाखेत खाते खोलून त्या खात्यावर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते, कामगाराने जमा केलेल्या रकमे एवढी रक्कम शासनाकडून कामगाराच्या खात्यावर जमा केली जाते. सदरील योजनेतून कामगाराच्या खात्यावर जमा होणाऱ्या रकमेवर व्याज हि जमा केले जाते. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला या योजनेचा लाभ घेता येतो, कामगाराचे मासिक वेतन हे रु. 15000 पेक्षा जास्त नसावे. वयाच्या 18 वर्षापासून ते 40 वर्षा पर्यंत योजनेचा लाभ घेता येतो.

कोणत्या वयाच्या व्यक्तीला किती हप्ता द्यावा लागेल Chart

तुमच्या वयानुसार दरमहा रक्कम वर्षानुसार वाढवण्याची योजना आहे. तुम्ही नोंदवलेल्या वयानुसार दरमहा रक्कमेची वाढता हप्ता तुम्हाला जमा करावा लागतो. वयाच्या 18 वर्षांपासून ते 40 वर्ष पर्यंत तुम्ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेऊ शकता. वयाच्या 60वर्ष नंतर तुम्हाला या योजनेच्या लाभला सुरुवात होते. पुढील प्रमाणे वाया नुसार तुमचे मासिक हप्ते येतात.

  • 18 वर्षांच्या अर्जदाराला 55 रुपये (मासिक/हप्ता)
  • 19 वर्षांच्या अर्जदाराला 58 रुपये
  • 20 वर्षांच्या व्यक्तीला 61 रुपये
  • 21 वर्षांच्या व्यक्तीला 64 रुपये
  • 22 वर्षांच्या व्यक्तीला 68 रुपये
  • 23 वर्षांच्या व्यक्तीला 72 रुपये
  • 24 वर्षांच्या व्यक्तीला 76 रुपये
  • 25 वर्षांच्या अर्जदाराला 80 रुपये
  • 26 वर्षांच्या अर्जदाराला 85 रुपये
  • 27 वर्षांच्या अर्जदाराला 90 रुपये
  • 28  वर्षांच्या अर्जदाराला 95 रुपये
  • 29 वर्षांच्या अर्जदाराला 100 रुपये
  • 30 वर्षांच्या अर्जदाराला 105 रुपये
  • 31 वर्षांच्या अर्जदाराला 110 रुपये
  • 32 वर्षांच्या अर्जदाराला 120 रुपये
  • 33 वर्षांच्या अर्जदाराला 130 रुपये
  • 34 वर्षांच्या अर्जदाराला 140 रुपये
  • 35 वर्षांच्या अर्जदाराला 150 रुपये
  • 36 वर्षांच्या अर्जदाराला 160 रुपये
  • 37 वर्षांच्या अर्जदाराला 170 रुपये
  • 38 वर्षांच्या अर्जदाराला 180 रुपये
  • 39 वर्षांच्या अर्जदाराला 190 रुपये
  • 40 वर्षांच्या अर्जदाराला 200 रुपये

वय वर्ष 40 असणाऱ्या व्यक्तीला प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेता येतो जर दरमहा 200 रुपये भरून योजनेसाठी अप्लाय करीत असेल तर या योजनेत तुम्ही पात्र ठरू शकता.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना निकष

  • जर निवृत्तीवेतनधारक लाभार्थी या योजनेतून 10 वर्षांनंतर परंतु 60 वर्षापूर्वी बाहेर पडला आहे, तर त्याला पेन्शन योजनेत मिळालेल्या वास्तविक व्याजासह त्याच्या योगदानातील हिस्सा परत केला जाईल.
  • जर त्याचं निवृत्तीवेतन 60 वर्षांपूर्वी होतं, आणि त्याच्या योजनेतून बाहेर पडल्यास, त्याला वास्तविक व्याजासह पेन्शन योजनेत मिळालेल्या व्याजाची रक्कम परत केली जाईल.
  • कोणत्याही व्यक्तीने किंवा सदस्याने कोणत्याही कारणासाठी त्याच्या योजनेत 10 वर्षांच्या आत बाहेर पडल्यास, त्याला व्याजासह देय रक्कम भरून हप्ता भरण्याची परवानगी दिली जाईल. व्याजाचे दर त्याच्या योजनेत ठरवले जाईल, ज्यामुळे त्याच्या योगदानाचं हिस्सा त्याला परत मिळेल.
  • पती आणि पत्नी दोघे या खात्यासाठी पात्र आहेत, या योजनेतील लाभार्थ्याला नियमित हप्ता भरावा लागेल. जर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती किंवा पत्नीस या योजनेचा लाभ भेटू शकतो, मात्र योजनेचे हप्ते नियमित भरावी लागतील.
  • जर या योजनेतील निवृत्तीवेतनधारकाचं मृत्यू 60 वर्षां नंतर झाला तर त्याच्या नॉमिनीला 50 टक्के पेन्शन मिळेल. या प्रमाणे, योजनेच्या नियमानुसार निवृत्तीवेतनधारकाचं मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला त्याचे पेन्शन मिळेल.
  • योजनेमध्ये वयाच्या 60 वर्षापूर्वी तात्पुरते अपंग झालेल्या व्यक्तीला योजनेत योगदान देण्याचा पर्याय दिला जातो. योजनेच्या नियमानुसार, त्याच्यासाठी योजनेत व्याजासह आपला हिस्सा देऊन योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय असेल.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत नोंदणीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असंघटीत कामगाराला आसते. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

  1. आधार कार्ड
  2. बचत खाते किंवा जन धन खाते.
  3. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट
  4. रेशन कार्ड.
  5. पत्नीचे आधार कार्ड.
  6. लाभार्थ्याचे दोन पासपोर्ट साईज फोटो.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा करायचा 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत नोंदणी करण्यासाठी CSC केंद्रावर जाणे लागेल. येथे तुमचे आधार कार्ड, बचत खाते/ जन धन खात्याची माहिती देवून भरायची आहे. तुमच्या नॉमिनीची नोंदणी केल्यास आपोआप मासिक हप्त्याची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा पहिला हप्ता रोख स्वरूपात ध्यावा लागेल. योजनेच्या योजनेचा हप्ता रोख स्वरूपात देण्याची प्रक्रिया चालू केली जाते. तुमच्या खात्यातील माहितीच्या आधारे तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल. नोंदणी पूर्ण करण्यासाठी, स्थानीय CSC केंद्रात संपर्क साधा किंवा पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी PM-SYM पोर्टल वर लॉगीन करा.

Conclusion 

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजने विषयी आम्ही या लेखात आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे या लेखा च्या आधारे तुम्ही सदरील योजनेसाठी Online अर्ज करू शकता, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेचा लाभ मिळवू शकता. आम्ही आमच्या blog च्या माध्यमातून नेहमीच शासनाच्या नवनवीन योजना ओल्या पर्यंत पोहोचवीत असतो, अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा, माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा 

Scroll to Top