बांधकाम कामगार घरकुल योजना ही शासनाच्या बांधकाम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून राबविली जाणारी योजना आहे. या योजनेतून बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कल्याणकारी मंडळाकडून घरकुल बांधकामासाठी अनुदान स्वरुपात निधी दिला जातो. महाराष्ट्रातील कामगार मंडळाकडे नोंदणी असलेले लाभार्थी या योजनेचा फायदा घेवू शकतात. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी नंबर तुमच्याकडे असायला हवा, तसेच नोंदणी रिणीव केलेली असावी. बांधकाम कामगार घरकुल योजना काय आहे, आणि पात्रता व कागदपत्रे कोणती लागतात या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
बांधकाम कामगार
महाराष्ट्रात असंघटीत कामगार म्हणून बांधकाम कामगार ओळखले जातात. बांधकाम कामगारांची संख्या महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मजुरास बांधकाम कामगार संबोधले जाते. बांधकाम कामगार यांना कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामना करावा लागतो. या गोष्टीचा विचार करत शासनाने बांधकाम कामगारांच्या आर्थिक, सामाजिक, शेक्षणिक उथानासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांची स्थापना केली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडे अधिकृत नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून आर्थिक, सामाजिक, शेक्षणिक लाभाच्या अनेक योजनाचा लाभ सरळ कामगाराच्या खात्यावर दिला जातो.
बांधकाम कामगार घरकुल योजना
बांधकाम कामगार यांना इतर योजना बरोबरच घरकुल योजनेचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडून घेता येतो. बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी असलेला लाभार्थी सदरील योजनेसाठी अर्ज करू शकतो. या योजनेतून ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात वेगवेगळे अनुदान दिले जाते. अनुदांचे स्वरूप काय आहेत ते खाली पाहू.
- ग्रामीण भागात बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी एक लाख पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाते.
- शहरी भागात बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी दोन लाख रुपये अनुदान दिले जाते.
बांधकाम कामगार घरकुल योजना पात्रता
बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील बांधकाम कामगार यांच्याकडे पुढील प्रमाणे पात्रता असावी लागते.
- बांधकाम कामगार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- बांधकाम कामगार म्हणून त्याची नोंद कामगार विभागाकडे असावी.
- बांधकाम कामगार याच्याकडे स्वतः ची जागा उपलब्ध असावी.
- बांधकाम कामगाराची नोंदणी ही चालू वर्षात रिणीव केलेली असावी.
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
- बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेले नोंदणी क्रमांक पावती.
- बांधकाम रिनिवल पावती.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- सहान जागा उपलब्ध असलेले ग्रामपंचायत नमुना न.8.
- ग्रामपंचायत ठराव.
- बांधकाम कामगार घरकुल योजना फॉर्म वर सरपंच-ग्रामशेवक यांची सही असलेला परिपूर्ण अर्ज.
- लाभार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो.
- रेशन कार्ड.
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
बांधकाम घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी संपूर्ण कागदपत्रासह अर्ज हा पंचायत समिती कार्यालयाला सादर करायचा आहे. पंचायत समितीला अर्ज सादर केल्या नंतर गटविकास अधिकारी यांचे पत्र जोडून तो अर्ज आपल्या जवळील कामगार कार्यालयाला दाखल करायचा आहे. ही प्रोसेस पूर्णतः ऑफलाईन आहे. अर्ज लाभार्थ्याला स्वतः नेवून द्यायचा आहे. अर्ज दाखल केल्या नंतर कार्यालयाकडून कागदपत्रे पडताळणीसाठी जवळच्या कार्यालयाला हजार व्हावे लागेल.
बांधकाम कामगार घरकुल योजनेतून मिळणारे अनुदान हे सरळ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. मिळणारे अनुदान हे एक रकमी असते. अनुदानाची संपूर्ण रक्कम एकदाच लाभार्त्याच्या खात्यावर टाकली जाते. या योजनेसाठी लागणारा अर्ज जवळच्या कांगार कार्यालयातून उपलब्ध करता येतो.
अधिक माहितीसाठी कामगार कल्याण मंडळाच्या वेबसाईट ला भेट द्या – mahabocw.in
सारांश
बांधकाम कामगार घरकुल योजना: बांधकाम मजुरांना घरकुलसाठी अनुदान मिळणार दोन लाख रुपये या लेखात आपण बांधकाम कामगार घरकुल योजना पात्रता आणि कागदपत्रे आणि कुठे करायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली. नोंदणी असलेले बांधकाम कामगार लाभार्थी सदरील योजनेचा लाभ घेवू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
हे ही वाचा :-
- Kamgar Kalyan Scholarship Scheme 2025:- बांधकाम कामगार कल्याण स्कॉलरशिप अर्ज Online
- www mahabocw in renewal online: 2025 बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल
- Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती तपासा
- Bandhkam Kamgar Mobile Number Change: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी दिलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा
- BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा
- बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना
- बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना
- बांधकाम कामगार यादी: अशी चेक करा बांधकाम कामगार यादी
- बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय : तपासणी ते उपचार आरोग्य योजना
- बांधकाम कामगार योजना फायदे: Construction Worker Scheme Benefits
- बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: अशी करा कामगार नोंदणी
- बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: अशी करा कामगार नोंदणी
- बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड/Construction Worker Smart Card
- Kamgar Kalyan Scholarship- कामगार कल्याण शिष्यवृत्ती दाव्यासाठी कागदपत्रे पडताळणीची तारीख बदला
- महाराष्ट्र कामगार नोंदणी: कामगार नोंदणी करा मोबाईल वरून
- Mahabocw Payment receipt: Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची
आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खलील लिंक वर जा.