भाषण कसे करावे मराठी: प्रभावी भाषण कसे करावे शिका सर्व मुद्दे

भाषण एक कला आहे ज्याद्वारे आपण पाले विचार आपले मत हे एका समूहा समोर मांडू शकतो, त्यांना ते पटवून देवू शकतो. आपल्या विचारांचा प्रभाव हा इतरांवर प्रभावी पन निर्माण करू शकतो. एखादं भाषण ऐकत असताना ज्या वेळेस श्रोते म्हणून आपण बसलेलो असतो, त्या वेळेस जे विचार आपल्या डोक्यात येतात, तेच विचार सरळ श्रोत्या समोर सरळ ऊभे राहून आपण मांडू शकतो का ? याचे उत्तर निश्चितच नाही असेल.तुम्ही जेंव्हा भाषण करायला लोकान समोर उभे राहता तेंव्हा तुमच्या पोटात गोळा येतो, तुमचे पाय लटपटायला लागतात.पण निश्चितच ह्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणता येवू शकते.त्याच विषयी आपण आज भाषण कसे करावे मराठी ह्या लेखात जाणून घेणार आहोत.भाषण तयार करणे व प्रत्यक्ष भाषण देने, या बाबतचे महत्वाचे घटक तुम्ही आत्मसात करू शकता.

भाषणाच्या पहिल्या काही मिनिटात श्रोत्यावर ताबा कसा मिळवायचा, तुमचे भाषण लोकांना आवडावे व ते अर्थपूर्ण व्हावे हया साठी काय करावे लागते, तुमच्या भाषणाचा प्रभाव लोकांन समोर चांगल्या प्रकारे पडावा .भाषणाच्या प्रभावी सुरुवाती बरोबरच भाषणाचा भाषणातील मुद्दे , भाषणाचा समारोप व भाषण दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात कसे राहील या सर्व बाबी आपण या लेखात पाहणार आहोत.भाषण कसे करावे मराठी

मित्र हो जर तुम्हाला खरच भाषणकला शिकायची असेल तर भाषण कसे करावे मराठी Learn How to make best speech in Marathi हा लेख शांत चित्ताने व वारंवार पूर्ण वाचून काढा याचा फायदा तुम्हाला नक्कीच झाल्या शिवाय राहणार नाही.

भाषण कसे करावे /Learn How to Make The Best Speech In Marathi

आपल्या क्षेत्रात हुशार व अनुभवी असणारी लोकं जे आपले मते आणि विचार इतरांशी सामोरा अमोर असताना चांगल्या प्रकारे मांडू शकतात. असे लोक सुद्धा एखाद्या लहानशा गटासमोर उभे राहून बोलायचे म्हटल तर घाबरून जातात. सहकार्यांच्या किंवा आपल्याच फिल्ड मधल्या लोकांसमोर बोलता येत नसल्यामुळे , कित्येक व्यासायिक,राजकीय पुढारी यांची कारकीर्द संपुष्टात येते.आपले कित्येक महत्वाचे विचार, योजना समाजामध्ये मांडण्या एवजी काही तरुण केवळ बोलता येत नसल्यामुळे आपल्या कडेच ठेवतात. पण भाषण कसे करावे मराठीLearn How to make best speech in Marathi या लेखा द्वारे तुमच्या भीतीवर अगदी सोप्या पद्धतीने विजय मिळवला जाऊ शकतो.

भाषण कसे करावे मराठी 

लोकांच्या समूहासमोर शांत आणि स्पष्ट आपले विचार मांडता येणे ही ही एक कला आहे आणि लोकांना वाटते त्याच्या एक टक्का ही अवघड नाही. काही ठराविकच लोकांना मिळालेली ही काही दैवि शक्ती नाही तर अभ्यासाने आणि निरंतर प्रयासाने सहज शक्य करता येणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील काही गाजलेले वक्ते ज्यांची भाषणं आपण एकतो त्यांना हि या परिस्थितीतून जावे लागले आहे.

मनातील भीती काढून धेर्य वाढविणे

श्रोत्या मध्ये बसल्यावर जसा विचार आपण करू शकतो किंवा जे विचार आपल्या मनात येतात तसे श्रोत्या समोर उभे राहून आपण विचार करू शकत नाही किंवा श्रोत्या समोर उभे असलेल्या अवस्तेत आपल्या मनातील विचार, कल्पना, योजना आपण मांडू शकत नाहीत. असे का होते याचे उत्तर आपल्याकडे नाही.खरं तर एखाद्या समूहा समोर उभे राहून बोलायचे म्हणजे स्फूर्ती तुमच्यात यायला पाहिजे, कारण एका समूहा समोर आपले विचार-कल्पना मांडण्याची एक संधी तुम्हाला मिळालेली असते. बऱ्याच सुप्रसिद्ध वक्त्यांचा अनुभव बघितला तर अधिक समूहाच्या उपस्थिती मध्ये ते त्यांचे विचार अधिक चांगल्या व प्रखर पणे मांडू शकतात.

अशा वेळी त्यांची भाषणे त्यांच्या ही कल्पने पलीकडची प्रभावी होतात. अशावेळी वक्त्याला उपस्थित समुदायासमोर आपला प्रभाव निर्माण करून आपली लोकप्रियता वाढविण्याची उत्तम संधी असते.या साठी तुम्हाला अनुभवाची आवश्यकता असते, जे आपण सरावाने आणि संयमाने मिळवू शकतो.

तुम्हाला खात्री असायला हवी कि अभ्यास व सरावाने तुमच्या मनातील श्रोत्या बद्दल ची भीती कमी होईल, व तुमचा आत्मविश्वास जागृत होऊन तुमच्या मनात धैर्य निर्माण होईल. आपल्यासाठी ही बाब एकदम वेगळी आहे किंवा आपण हे करू शकत नाही असे समजू नका ,कारण आपण आज जे गाजलेले वक्ते पाहतो ते सर्व याच परिस्थितून गेलेले आहेत.

त्यामुळे भाषण कसे करावे मराठी  हा लेख वाचल्यानंतर तेच करू शकतात आपण करू शकत नाही हा विचार सुरुवातीलाच मनातून काढून टाका. समूहा समोर भाषण करायला उभे राहिल्यावर पोटात गोळा येणे हातपाय थरथरणे किंवा बोबडी वळणे या स्ठीतून प्रत्यकच वक्ता गेलेला असतो. त्यामुळे आपल्यालाच होतंय असा भाग नाही. पण प्रत्यक मोठ्या वक्त्याने अभ्यास आणि सारावाद्वारे यावर मात केलेली असते. आपण ही निशितच त्यावर मात करू शकतो, ह्यात शंका नाही.

भाषण करत असताना वक्त्याला थोडासा दबाव, एक तान निचीतच जाणवत असतो कारण त्याच्यावर एक विषय आपल्या विचारात आणि मतात मांडण्याची जबादारी असते, अशा वेळी वक्त्याला जातिवंत असल्या सारखे स्वतः ला उल्हासित ठेवावे लागते. भाषण कलेच्या सर्व गुणांचा अभ्यास केल्यास घाबरटपणा केवळ स्वभावगुण असू शकतो ज्यावर नंतर मात करता येते.

नियमित भाषण देणारे वक्ते भाषणाची सुरुवात करताना आपल्या भीती पायी जागरूक बनतात पण भाषण देताना एकदा आपल्या पायावर उभे राहिले कि नंतर काही सेकंदातच त्यांची ही भीती पळून जाते. भाषण कसे करावे मराठी   या लेखातून तुम्हाला पूर्णपणे भाषण कला शिकायची असेल तर पुढील चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.

भाषण कला शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी 

भाषण कला शिकण्यासाठी तुमची अत्यंतिक तळमळ व उत्कट इच्छाशक्ती असली पाहिजे अतिशय आस्थेने आणि चिकाटीने तुम्ही जर वक्तृत्व कला शिकण्यासाठी प्रत्नशील असाल तर निचीतच भाषण कसे करावे मराठी तुम्हाला या लेखाचा फायदा होईल आणि तुम्ही उत्कृष्ठ वक्ते बनू शकाल.

त्यामुळे वक्तृत्व कला शिकण्यासाठी तुमची आत्मशक्ती जागरूक करा, समोरच्या व्यक्तींना आत्मविश्वासपूर्ण बोलता येणे हे तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे स्वतः ला पटवून द्या. भाषणकले मुळे तुम्हाला नवीन मित्र मिळतील आणि तुमचा वयक्तिक प्रभाव वाढून समाजाचे नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळेल याचा विचार करा.तुम्हीजर या गोष्टीचा विचार करत असाल तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ही कृती तुम्हाला समाजाचे नेतृत्व करण्याची संधी लवकर उपलब्ध करून देयील.

एका नवीन शक्तीचा उदय तुमच्यामध्ये झालेला असेल, आणि त्यामुळे मिळणाऱ्या आनंदाची परीशिमा ही अतिशय उंच असेल. जेंव्हा निखळ आणि चिरकाल टिकणाऱ्या अंतर्शक्तीचा विचार होतो तेंव्हा श्रोत्या समोर उभे राहून श्रोत्यांना स्वतः च्या दृष्टीने विचार करण्यास भाग पाडण्यात जे समाधान मिळते ते समाधान इतर गोष्टीने मिळणे फारच थोड्या प्रमाणात शक्य आहे. ते तुम्हाला तुमच्या आंतरिक ताकदीची जाणीव करून देयील. या भाषण कसे करावे मराठी लेख तुम्हाला तुमच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा निचीतच यशस्वी करेल.

भाषण करताना काही लोक भीतीने कमजोर होतात, आणि वक्त्रत्व कलेत माघे राहतात. पण मनाशी ठरवून पुढे जाण्याचा मार्ग जेवढा सोपा करता येयील तेवढा सोपा करा. आणि परत फिरण्याचा मार्ग जेवढा अवघड करता येयील तेवढा अवघड करा. खालील उदाहरण वाचा त्यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.भाषण कसे करावे मराठी Learn How to make a speech in Marathi

उदा

जेंव्हा तानाजी मालुसरे यांनी कोंडाणा गड जिंकण्याचा पण केला तेंव्हा त्यांनी अतिशय कमी सैनिकांच्या जोरावर गड जिंकण्याचे ठरवले होते. त्यांनी आपल्या लहानशा सैनिक तुकडी सह अतिशय दुर्गम असलेल्या कोंडाण्याच्या कडा एका दोराच्या साह्याने चढून सैन्न्य कोंडाण्यावर नेले. पण गडावर असलेले उदयभान याचे सैन्य पाहून तानाजी सोबत असलेले सैनिक घाबरून गेले, कि उदयभान च्या एवढ्या मोढ्या सैनिका सोबत कसे लढायचे,सैनिकांच्या मनात भीती निर्माण झाली. सैण्यातील काहींच्या मनात गडावरून खाली उतरायचे विचार येवू लागले तेंव्हा तानाजी पुढे झाले आणि त्यांनी तो दोरच कापून टाकला. आणि सैन्याला आव्हाहन केली कि एकतर सैन्यासोबत लढत मारा किंवा गडावरून उड्या मारून मरा, तेंव्हा तानाजींच्या तुकडीतील सैनिकानी लढण्याचा निर्धार केला. कारण गडावरून उतरण्याचा मार्ग नव्हता, दोर कापल्याला होता मग सैनिक जीवाच्या अकांग्ताने लढले आणि कोंडाणा जिंकला.

भाषणाची सुरुवात कशी करावी 

भाषणाला उभे राहण्या आगोदर ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहात त्या विषयाची परीपूर्ण माहिती तुम्हाला असावयास हवी जो पर्यंत तुम्ही या बाबत माहिती घेणार नाहीत, तो पर्यंत श्रोत्यांशी सामना करताना तुम्हाला स्वस्त आणि आरामदायक वाटणार नाही तुमच्या जवळ सांगण्यासारखे निश्चितच काहीतरी असले पाहिजे त्याशिवाय तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करणे निष्फळ ठरेल

घाबरटपानावर आणखी एका मार्गाने मात करता येऊ शकते जर श्रोत्या समोर तुम्हाला गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडायचे असेल तर काही कागद आणि पुस्तके हलवता आली कोणतीही शारीरिक हालचाल ज्या माघे काहीतरी कारण आहे, ती केल्यास तुम्हाला योग्य स्थितीवर असल्यासारखे वाटण्यास सहज मदत करील

भाषण करताना आत्मविश्वास कसा निर्माण करायचा 

मनावर कितीही दडपण असले तरीही आनंदाने व आत्मविश्वासाने असे वागायचे आणि बोलायचे की जणू काही ते तुमच्यात पूर्वी पासूनच होते. असे वागणे जर तुम्हाला आनंदी बनवू शकले तर त्या पेक्षा मोठी गोष्ट दुसरी नाही. आपण धाडसी आहोत हे सिद्ध करून दाखवायचे असेल तर धाडसी असल्या सारखे वागावे लागेल, त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व आत्म शक्तीचा वापर करावा लागेल. भीतीच्या जागी नक्कीच धेर्याचा उदय होईल.

अशाप्रकारे वागा कि, जणूकाही तुमच्यामध्ये पूर्वीपासूनच धैर्य आहे. अर्थातच तुमची तुमची तयारी असायला हवी नाहीतर जगातील कुठल्याच अभिनयाचा फारसा फायदा होणार नाही. तुम्ही काय बोलणार आहात याची परिपूर्ण माहिती तुम्हाला आहे, हे गृहीत धरून आत्मविश्वासाने पाउल टाका आणि दीर्घ श्वास घ्या.ऑक्सिजन चा हा वाढीव साठा तुम्हाला हिंमत देईल आणि तुमचे धैर्य जागृत करेल.

भाषण करायला ऊभे राहत असताना तुमच्या उंचीच्या पूर्ण क्षमतेने उभे रहा, आणि श्रोत्यांच्या डोळ्यात डोळे घालून पहा. अशा प्रकारे बोलण्यास सुरुवात करा कि, श्रोत्यामधील प्रत्येक जन जणू तुमचा देणेकरी आहे, अशी कल्पना करा कि ते तेथे तुमच्या कर्जाची परत फेड करायला आलेले आहेत. याचा फायदा तुमचे मनोबल वाढविण्यासाठी नक्की होईल. भाषण करताना उगाच आपल्या कपड्याच्या बटनाशी खेळत बसू नका. जर जास्तच अस्वस्थ वाटत असेल तर आपले हात पाठीमाघे न्या म्हणजे तुमच्या मनामधील नैराश्य श्रोत्यांना दिसणार नाही.आपल्या विचारांचा एक संदेश घ्या आणि असा विचार करा की, तो संदेश तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या समोर आला आहात. त्या नंतर निश्चय पूर्वक बोला .

अशा पद्धतीने अधिक अधिक संधीचा आणि भाषण कसे करावे मराठी या लेखाचा फायदा घेवून तुम्ही एक चांगले वक्ते बनू शकता.

भाषण कसे करावे मराठी /Learn How to Make The Best Speech In Marathi

भाषण देण्यापूर्वी वक्त्याने केलेली तयारी एखादा स्पष्ट आणि निश्चित विचार. एखादा विषय ज्याने ठसा उमटवला आहे ज्याच्या डोक्यात आणि हृदयात अर्थपूर्ण संदेश असून ते अतंत्य तळमळीने हा संदेश तुमच्या डोक्यात आणि हृदयात पोहचू इच्चीतात वकृत्व कले बाबतचे अर्धे रहस्य यातच आहे जेव्हा वक्ते अश्याप्रकारच्या मानसिक आणि भावनिक अवस्ठे मद्धे असतात त्येव्हा त्यांना एका महत्वाच्या गोष्टीचा शोध लागलेला असेल ती म्हणजे त्यांचे भाषण आपोआपच चांगल्या प्रकारे होईल.

भाषणाची तयारी करण्याचा योग्य मार्ग

एखाद्या पुस्तकातून पाठांतर करून जर जास्याचे तसे विचार मांडण्याचा प्रयत्न केल्यास कुठे तरी श्रोते आपल्याला पकडल्या शिवाय राहणार नाहीत. पण पुस्तकातून वाचून त्या मधील विचार आपल्या आपल्या पद्धतीने मांडल्यास नक्कीच श्रोत्यांना आवडेल मग तुम्ही त्या पुस्तकाच्या लेखकाच्या विचाराशी सहमत आहत किंवा नाही हे ही तुम्ही अगदी बिन्दास्त मांडू शकता.भाषण कसे करावे मराठी

तयारी म्हणजे नक्की काय

भाषण कसे करावे मराठी या लेखात तयारी म्हणजे नक्की काय हे पाहू, भाषण करणे म्हणजे काही अचूक वाक्क्याची जुळवा जुळव करून पाठांतर करणे किंवा लिहून काढणे नाही, तर तुमचे विचार, युमच्या योजना, तुमची श्रद्धा आणि उत्कट इच्छा ज्या तुमच्याकडे आहेत. जे तुमच्या भावना आणि अनुभवाने भरलेल्या असतात.तयारी करणे म्हणजे विचार करणे, चिंतन करणे,जे विचार तुम्हाला भावतात त्याची निवड करणे, त्यांना तुमच्या स्वतः च्या अशा विशिष्ठ विचार सारणीत समाविष्ठ करणे, हे जरा कठीण वाटत असले तरी थोडीशी एकाग्रता आणि परिश्रमातून मुद्द्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या विषयावर जेंव्हा तुम्ही भाषणाची तयारी करता तेंव्हा त्या विषय बद्दल मिळालेली प्रत्यक माहिती लिहून काढा सुरुवातीला तुम्हाला त्या विषयाविषयी काय वाटले आणि आता कोणते विचार तुमच्या डोक्यात येत आहेत हे लिहून काढा.

तुमच्या डोक्यात येणाऱ्या प्रत्येक कल्पना लिहून काढा, तुमचे मन सतत नवीन कल्पना साठी तयार ठेवा. आणि या विचारातून कः नवीन विचार सुचतात का हे पडताळून पहा आणि सुचलेल्या सगळ्या विचारातून एक प्रगल्भ रसायनाची निर्मिती होतेका हे ही पडताळा.

इतर कोणाची ही मदत ना घेता तुमच्या मनातील विचारांना चालना द्या तुमच्या मानाने निर्माण केलेल्या सर्व योजना लिहून काढा. तुमची मानसिक शक्ती उलगडणाऱ्या त्य योजना हिरे,माणिक,मोती या पेक्षा ही मोल्यवान आहेत. जेंव्हा तुम्ही त्याची योग्य मांडणी कराल तेंव्हा ते साहित्य उच्च कोटीचे तयार हौइल.

लिहून काढलेल्या मुद्द्यावर सतत विचार करत, ज्या नवीन कल्पना सुचतात,त्या सर्व लिहून काढा या प्रकीर्ये कडे दुर्लक्ष करू नका ही अत्यंत महत्वाची अशी मानसिक प्रक्रिया आहे. जिचे भाग्य तुम्हाला लाभलेले आहे.हीच खरी ती पद्दत आहे, जिच्यामुळे तुमच्या मनाची सर्जनक्षमता वाढते. भाषण कसे करावे मराठी या लेखातून तुम्ही ती मिळवणार आहात.

भाषण कसे तयार करावे

भाषण कसे करावे मराठी या लेखातून आपण भाषण कसे तयार केले जाते हे सविस्तर पाहणार आहोत  विध्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस स्वतः च्या विषयावर भाषण करण्यास सांगितले जाते त्या वेळेस तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडला पाहिजे , ज्या विषयाची गोडी तुम्हाला आहे किना ज्या विषयाची परिपूर्ण माहिती तुमच्या कडे आहे असाच विषय त्यावेळी निवडला पाहिजे,बऱ्याच वेळा तुम्ही तुमचे स्वतः चे विषय निवडू शकता तर कधी तुमचे शिक्षक तुम्हाला विषय सुचवतात .भाषण कसे करावे मराठी

मित्रांनो भाषण कसे करावे मराठी मध्ये या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, छोट्या भाषणात बऱ्याच वेळेस काही विषय गुंडाळले जातात, मात्र ती चूक तुम्ही करू नका. विषय बाबतचे एक किंवा दोनच दृष्टीकोन विचारात घ्या आणि त्यावरचा पुरेसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेस वेळापत्रकाच्या बंधनामुळे असे केले जाते पण तुम्ही हे करणे टाळा.

भाषणाच्या तारखेच्या कमीत कमी एक आठवडा अगोदर आपला विषय निवडा, म्हणजे रिकाम्या वेळेत त्यावर विचार करण्यास तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. तुमच्या प्रत्यक रिकाम्या वेळेत त्या विषयावर विचार करा. त्यावर चर्चा घडवून आना, त्यामुळे त्या विषयावरील नवीन कल्पना, विचार तुम्हाला सुचतील.

ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहात त्या विषयावरील प्रश्न स्वतः ला विचार समजा तुम्ही आजच्या राजकीय स्थिती या विषयावर बोलणार असाल तर अगोदर आजच्या राजकीय स्थिती ला आपण जबाबदार आहोत का, आजचे राजकारणी आपला वापर करून घेत आहेत का, हो तर मग कसा वापर करून घेत आहेत या सर्वस बाबीचा विचार स्वतः पासून करा. राजकीय लोकांन मुळे समाजात होणारे फायदे तोटे याचा विचार स्वतः ला प्रश्न विचारून करा.

दुसरीकडे पण आता असा विचार करू कि तुमचा जो उद्योग धंदा आहे, या बाबत बोलायचे असल्यास अशा विषयावर तुम्ही कशा पद्धतीने तयारी कराल, कारण या विषयावरचा तुमचा अनुभव खूप मोठा असेल बऱ्याच गोष्ठी तुमच्याकडे सांगण्यासारख्या असतील. या गोष्टीतून कोणता मुद्दा निवडावा व तो श्रोत्यांमध्ये कशा पद्धतीने मांडावा सगळ्याचा गोष्ठीवर थोडं थोडं बोलण्या पेक्षा त्यातील एकच मुद्दा निवडा आणि तो अधिक चांगल्या प्रकारे कसा मांडता येयील याचा अभ्यास करा.

मुद्दा निवडल्या नंतर त्यावर सविस्तर बोला जसे कि तुम्ही त्य व्यवसायात कसे आलात, स्व इच्छेने आलात का अपघाताने आलात, या व्यवसायासाठी तुम्हाला कायकाय तडजोडी कराव्या लागल्या. अगदी सुरुवाती पासून सांगा तुमच्या याशाविषयीच्या सर्व गोष्ठी अगदी रंगत पूर्ण सांगा. एखादी गोष्ठ विनम्र पूर्ण सांगितली गेली आणि त्यात इतरांना दुखावेल अशी आत्मस्तुती नसेल तर ती अत्यंत मनोरंजक ठरते.

भाषण करताना तुम्ही तुमचे भाषण उपदेशाचा डोस बनवू नका. ते तुमच्या श्रोत्यांना कंटाळवाणे वाटेल, केक मध्ये जसे विविध थर असतात, तसेच थर तुमच्या भाषणात माहितीचे आणि त्यावरील सामान्य भाष्य असे वेग वेगळे स्तर बनवा. सत्य आणि अर्थ्पुर्णतेचे दर्शन घडवणाऱ्या घटना बाबत विचार करा. तुम्हाला हे सुद्धा दिसून येयील कि, केवेल माहिती लक्षात ठेवण्या पेक्षा या पक्या घटना लक्षात ठेवणे जास्त सोपे आहे. या घटना तुम्हाला मदत करतील आणि तुमचे भाषण अधिक चांगले बनवतील.

शंभर विचार गोळा करा आणि त्यातील 90 फेकून ध्या. जेवड्या साहित्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे, त्यहुअन अधिक साहित्य जमा करा. तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याला खात्रीचा स्पर्श होण्यासाठी ते साहित्य गोळा करा, तुमच्या विचारावर, तुमच्या ह्रदयावर आणि एकंदरीत तुमच्या बोलण्याच्या पूर्ण पध्दतीवर होणाऱ्या परिणामासाठी ते जमा करा.हीच ती मुलभूत आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ठ आहे. जिच्या आधारे तयारी केली जाते. परंतु तरीही वक्ते जाहीर रित्या आणि खाजगीत नेहमीच त्या कडे दुर्लक्ष करतात.

“डेल कार्नेगी” यांच्या पुस्तकातील काही सूचना

  • तुम्हाला तुमच्या भाषणाच्या विषयाचा जेवढ अभ्यास करता येयील तेवढा करा, त्या विषय बद्दल जेवाडी जास्त माहिती गोळा करता येयील तेवडी करा. ते विचार लिहून काढा.
  • तुम्हाला उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करून स्वतः ला विषयाबद्दल च्या माहिती ने परिपक्व बनवा.
  • नेटच्या मदतीने किंवा विविध पुस्तकाच्या साह्याने तुमच्या विषया बद्दल ची माहिती मिळवा आणि त्याचा संग्रह करा.
  • महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलणार आहात त्याना ओळखून त्यावर विशेष लक्ष द्या.
  • अशा महत्वाच्या प्रकाश टाकणाऱ्या घटनांचा व्यवस्थित आढावा घ्या.
  • आवश्यक असेल तेथे टिपणी,रेखाचित्र, आलेख याचा वापर करा आणि सर्व मुद्दे परिणामकारक पणे समाविष्ठ करण्या कडे लक्ष द्या.
  • तुमच्या विचारांना श्रोत्याकडून विरोध होऊन त्या बाबत अक्ष्येप ही घेतले जावू शकतात हे विचार करून त्या बाबत चर्चा करण्याची आणि त्या विरोधात पुराव्यांसही खंडन करण्याची तयारी ठेवा.

भाषण कसे करावे मराठी /Learn How to Make The Best Speech In Marathi या प्रकरणात दिलेल्या सूचनांचे पालन करा, भाषण परिणामकारक करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. भाषणाची आखणी करण्यासाठी तुम्हाला ठराविक वेळ देवून तयारी करावी लागेल.

डॉ. रसेल एच. कॉनवेल” जे “एकर्स ऑफ डायमंड्स ” या पुस्तकाचे लेखक आहेत त्यांनी सुचविलेल्या भाषणातील आराखड्यातील काही युक्त्या खालील प्रमाणे आहेत.

  • वस्तुस्थिती सांगा,त्या बाबत चर्चा करा,त्यावर प्रत्यक्ष कार्यवाहीचे आवाहन करा.
  • असे काहीतरी दाखवा जे चूक आहे, आणि त्याची दुरुस्ती कशी करावी लागते ते पटवून द्या, व त्यासाठी मदतीचे आवाहन करा.
  • लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्या , त्यांचा विश्वास जिंका,वस्तुस्थिती आणि तुमच्या दृष्टिकोनाचे फायदे लोकांना समजून सांगा.
  • भाषणाच्या हेतूबद्दल लोकांना आवाहन करा, जेणेकरून ते कृतीसाठी तयार होतील.

शब्दशः पाठांतर करू नका

भाषणाची तयारी करताना भाषण शब्दशः पाठ करू नका त्या मध्ये खूप वेळ सुद्धा जातो आणि वेळेवर मुद्दा विसरण्याचा किंवा मुद्द्याचा क्रम विसरण्याचा धोका सुद्धा असतो. पण काही जन हा हे सगळं माहित असताना ही अशा गोष्ठी करताना दिसतात. भाषण करायला उभे राहिल्यानंतर बर्याच वेळेस असे अनुभव येतात कि वक्त्याला अचानक पाठांतर केलेले भाषण आठवत नाही त्यमुळे गोंधळल्यावणी स्थिती होते व डोक्यातील पाठ केलेले भासान आठवत नाही. आणि मग अशा वेळेस काय बोलावे हे सुचत नाही, आणि त्यामुळे लोकांनसमोर हशा होण्याची भीती असते. त्यामुळे शक्य होईल तेवढ मुद्यावर लक्ष केंद्रित करा आणि मुद्यावरच बोला भाषा तुमची असेल, किंवा शुद्ध नसेल तरी हरकत नाही. कारण बोलीभाषेतील भाषण लोकांना समजायला सोपं जाईल व त्याचा प्रभाव हि लोकांन वर पाडेल.

श्रोत्यांना जागृत व उत्साही ठेवा

भाषण कसे करावे मराठी मध्ये हे शिकत असतांना भाषणाचा विषय कोणता हि असो वक्त्याला वाटले पाहिजे कि आपल्या भाषणात एक अर्थपूर्ण संदेश आहे. जो श्रोत्यांना विषयाशी बांधून ठेवू शकतो. वक्त्याने प्रामाणिकपने सादर केलेले मत निचीतच श्रोत्या मध्ये भाषणाविषयी उत्साह भरल्या शिवाय राहत नाही. चंगल्या प्रकारे उत्साह व उर्जा दिलीतर वक्त्याचा प्रभाव वाफे प्रमाणे कितीतरी पतीने वाढत जातो.त्याच्या चुका होऊ शकतात पण तो अपयशी ठरू शकत नाही. आत्यंतिक आवड ..संवेदनशीलता व प्रामाणिक हेतू हे सर्व गुण तुमच्या भाषानामद्ये येवू ध्या या मुले श्रोते तुमच्या छोट्या मोठ्या चुका माफ करतील.

👉हे हि वाचा :- मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना/अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

भाषणाचा समारोप कसा करावा

सुरुवात आणि शेवट हे कोणत्याही कार्यात अतिशय चातुर्याने हाताळल्या जाणार्या गोष्टी आहेत. खरेतर समारोप हा भाषणाचा अत्यंत महत्वाचा बिंदू आहे. कोणती व्यक्ती शेवटी काय बोलते , भाषणाचा समारोप कसा करते किंवा कोणत्या शब्दाने करते, ते शब्द एकनाराच्या कानात गुंजत राहतील आणि तेच शब्द दिर्ग काळ स्मरणात राहतात. ज्या प्रमाणे तुम्ही भाषनाची सुरुत करण्याचे ठरवलेले असते, तसेच भाषणाचा समारोप कसा करायचा हे हि ठरवून ठेवायला पाहिजे.भाषण कसे करावे मराठी /Learn How to Make The Best Speech In Marathi या लेखात आपण या विषयी दिर्ग चर्चा करणार आहोत.

कृतीसाठी आवाहन करणे

भाषणाच्या माध्येमेअतून आपण असा मुद्दा मांडला आहे ज्यामुळे समाजात कुठलेतरी परिवर्तन घडू शकते, अशा वेळेस आपल्या भाषणाने प्रभावित झालेल्या लोकांना आपण देलेल्या संदेशा द्वारे त्या कार्यासाठी कृती करण्याचे आव्हान करणे हि एक Best पद्दत समारोपाची होऊ शकते.

संक्षीप्त, मुद्देसूद व प्रामाणिक प्रशंसा

एखाद्या मंडळामध्ये तुम्ही भाषण देत असाल, किंवा एखाद्या सामाजिक संस्थेच्या व्यासपीठावर बोलत असाल आणि त्या मंडळाचे किंव संस्थेचे काम चांगले असेल तर अशा वेळेस त्या मंडळाच्या अध्यक्ष व टीमची प्रशंसा तुम्ही त्या स्टेज वरून समारोप प्रसंगी करू शकता. किंवा एखाद्या समाज कार्यातील व्यक्तीच्या वाढदिवसाच्या कर्यक्रमात जर बोलत असाल आणि त्या व्यक्तीचे समाजातील काम चांगले असेल तर त्या व्यक्तीची प्रशंसा तुम्ही समारोपाच्या भाषणात करू शकता. मात्र समारोपातील प्रशंसा हि संक्षीप्त स्वरुपाची असावी बोलण्याच्या ओघात खूप लांबलेली नसावी. तसेच प्रशंसेने समारोप करत असताना ते मुद्द्यला धरून असावे म्हणजेच त्यात वायफळ बडबड नसावी आणि केलेली प्रशंसा हि प्रामाणिक असावी तस्या स्वरुपाची ती श्रोत्यांना जाणवली पाहिजे.

काव्यात्मक स्वरुपात समारोप करणे

भाषणाचा समारोप एखादे काव्यपंक्ती वाचून किंवा सुवचन वाचून करणे हे अत्यंत प्रभावी आहे. मात्र वापरलेले काव्य किंवा सुवचन हे त्या भाषणाच्या विषयाच्या मुद्द्याशी निगडीत आसवे, नुस्तेच वापरायचे म्हणून वापरलेले.नसावे.त्या काव्य पंक्तीत किंवा सुवचनातून एक संदेश लोकांन पर्यंत पोहचविता आला पाहिजे. भाषण कसे करावे मराठी /Learn How to Make The Best Speech In Marathi या लेखाद्वारे या गोष्टीवर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता.

भाषणाची तयारी करताना जो पर्यंत तुम्हाला एक चांगली सुरुवात आणि एक प्रभावी समारोप सापडत नाही तो पर्यंत त्याला शोधा, हुडकून काढा आणि त्यानंतर या दोघांची सांगड घाला. आजच्या धावपळीच्या काळात जो वक्ता आपल्या श्रोत्यांच्या मनाप्रमाणे भाषणात बदल करणार नाही, तो वक्ता श्रोत्यांना आवडणार नाही. आणि काही वेळा तर तो तिरस्काराचा विषय हि बनू शकतो. त्या मुळे श्रोत्यांना समजेल अशा पद्धतीने विषयाची मांडणी करणे हे केंव्हा हि संयुक्तिक असते. आणि जेंव्हा मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांना तुमचे भाषण असेच चालू राहावे असे वाटते त्या वेळेस पूर्ण मुद्दे मांडून यथावकाश तुमचे भाषण संपलेले आसवे, आणि हि अवस्था म्हणजे तुमची मेहनत आणि आमच्या भाषण कसे करावे मराठी या लेखाचे यश असेल.

👉हे ही वाचा:- श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना 2023-2024

Note :-

सदरील लेख हा “प्रभावी वक्ता, प्रभावी व्यक्ती” ( व्यक्तिमत्व विकास ) लेखक : – “डेल कार्नेगी”. मराठी अनुवाद : – “व्यंकटेश उपाध्ये”, “अनिल चेटगे” “निखील पाठक”. या पुस्तकाला प्रेरित होऊन लिहिलेला आहे. पुस्तकाचे अद्ययन करून, महत्वाचे मुद्दे घेवून मी माझ्या आणि समजण्यासाठी सोप्या असलेल्या भाषेत लिहिला आहे, तर काही मोजक्या ठीकांनी पुस्तकाची भाषा येवू शकते.

प्रभावी वक्ता, प्रभावी व्यक्ती” हे पुस्तक भाषण कला शिकणाऱ्या नावशिख्या व्यक्ती साठी अतिशय उपयुक्त आहे. अधिक चांगल्या प्रकारे भाषण कला शिकण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा.

👉हे ही वाचा :- रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

सारांश

मित्रांनो वरील blog भाषण कसे करावे मराठी: प्रभावी भाषण कसे करावे शिका सर्व मुद्दे या मध्ये आपण भाषण कला अवगत करण्यासाठी ज्या गोष्टींचा अभ्यास लागतो त्या अगदी सविस्तर आपण पहिल्या आहेत. वरील लेखाचा पुन्हा-पुन्हा अभ्यास केल्यास वक्र्तुत्व कला अवगत करण्यास फारशी अडचण येणार नाही. भाषण सादर करत असताना तयारी महत्वाची असते आणि तयारी कशा पद्धतीने करावी हे मुद्देसुद आपण पहिले आहे. प्रभावी भाषणाची सुरुवात ते शेवट अशा लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्या लेखात सांगितल्या आहेत त्याचा परिपूर्ण अभ्यास केल्यास आपण एक उत्तम वक्ते झाल्याशिवाय राहणार नाहीत , हे येथे खात्रीपूर्वक सांगावाशे वाटते.

आम्ही न्दिलेली माहिती आवडली असल्यास आमच्या Blogला Follow करा, बेल बठावर क्लिक करा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा

Scroll to Top