महाराष्ट्र मतदार यादी कशी चेक करायची: Maharashtra Voter List PDF

Maharashtra Voter List PDF- आपण भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात राहतो, भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. आपण आपल्या मतदानावर देशाचे सरकार बनवतो. वयाचे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला निवडणूक विभागाच्या मतदारयादी मध्ये आपले नाव टाकणे आवश्यक असते. एकदा मतदार यादी मध्ये नाव टाकले कि, आपण मतदान करू शकतो. आपण आपल्या एपीक नंबरच्या आधारे आपल्या गावाची किंवा शहराची मतदार यादी Download करू शकतो. तसेच आपल्या नावातील दुरुस्ती किंवा पात्याची दुरुस्ती देखील करू शकतो. महाराष्ट्र मतदार यादी कशी पाहायची ते आपण महाराष्ट्र मतदार यादी कशी चेक करायची: Maharashtra Voter List PDF या लेखात पाहणार आहोत. त्या बरोबरच मतदार यादी Download कशी करायची ते हि पाहणार आहोत.महाराष्ट्र मतदार यादी कशी चेक करायची: Maharashtra Voter List PDF

महाराष्ट्र मतदार म्हणून नोंदणी कशी करायची

भारतातील प्रत्येक नागरिकाला वयाचे १८ वर्ष पूर्ण झाल्या नंतर मतदानाचा अधिकार मिळतो, त्यासाठी आपल्याला आपण राहत असलेल्या भागातील मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक असते. एकदा नाव नोंदणी केली कि, निवडणूक विभागाकडून तुम्हाला मतदान ओळखपत्र घरपोच दिले जाते, त्याद्वारे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता.

मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला निवडणूक विभागाच्या https://voters.eci.gov.in/  या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर गेल्या नंतर तुम्हाला तिथे तुमची स्वतः ची लॉगिन आयडी बनवावी लागेल. आयडी बनविल्या नंतर तुम्ही तुमची मतदार म्हणून नोंदणी करू शकता त्यासाठी New registration हा पर्याय निवडून open  होणार फॉर्म तुम्हाला पूर्ण भरावा लागेल. फॉर्म भरून सबमिट केल्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर तुमच्या नोंदणीचे अपडेट दिले जाईल.

मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

  • तुमचे आधार कार्ड
  • तुमची शालेय शिक्षणाची T. C. किंवा प्रवेश निर्गम उतारा
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड

✅👉🏻 Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

Voter Id Track Application Status

मतदार यादी मध्ये नाव नोंदणी केल्या नंतर आपले मतदार ओळखपत्र तयार झाले किंवा नाही, अथवा भरलेल्या फॉर्म मध्ये काही त्रुटी आहे हे चेक करण्यासाठी निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही Application Status चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला Track Application Status या पर्यायावर क्लिक करावी लागेल. याला क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला भरायचा आहे. त्यावर तुम्हाला SMS द्वारे मिळालेला Reference नंबर टाकायचा आहे. दुसऱ्या रकान्यात राज्य निवडायचे आहे. आणि शेवटी Submit वर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मतदार यादी मद्ये नाव नोंदणी ची सद्य स्थिती पाहता येईल.

✅👉🏻 नरेगा जॉब कार्ड नंबर ऑनलाईन लिस्ट मध्ये चेक करा : असा करा जॉब कार्डसाठी अर्ज

मतदान ओळखपत्र ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे

मतदार नोंदणी केल्या नंतर मतदान ओळखपत्र हे तुम्हाला पोस्टाच्या मध्येमाणे घरपोच येते. मात्र कधी कधी ओळखपत्र यायला उशीर लागतो. अशा वेळेस तुम्ही निवडणूक विभागाच्या साईटवर जाऊन मतदार e-मतदार कार्ड Download करू शकतात. त्यासाठी तुम्हाला मतदाता सेवा पोर्ट्ल ला लॉगिन करून Download E-EPIC Card या पर्यायाला क्लिक करावे लागेल. या पर्यायाला क्लिक करताच ओपन होणाऱ्या फॉर्म वर पहिल्या रकान्यात तुमचे EPIC no. किंवा Reference no. टाकायचा आहे. त्या नंतर राज्य निवडून SEARCH बटनावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर SEND OTP वर क्लिक करून आलेला OTP त्या खालील रकान्यात भरून, सबमिट करायचे आहे. त्या नंतर Download वर क्लिक करताच तुमचे मतदान ओळखपत्र Download होईल नंतर तुम्ही त्याची प्रिंट मारू शकता.

✅👉🏻 PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा

मतदान यादी नाव व पत्ता दुरुस्ती

मतदार म्हणून नोंदणी केल्या नंतर जर तुमच्या नावात काही चूक झाली असेल तर ती तुम्ही ऑनलाईन अर्ज करून दुरुस्त काऊ शकतात. मतदान यादीतील नाव दुरुस्त करण्यासाठी तुम्हला निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर जाऊन Shifting of residence/correction of entries in existing electoral हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय निवडताचApplication for-

  • Issue of Replacement EPIC without correction
  • Request for marking as Person with Disability

वरील पर्यायातून एक पर्याय निवडून तुम्ही तुमच्या नावातील दुरुस्ती, तुमच्या ऍड्रेस मधील दुरुस्ती किंवा तुम्ही अपंग असल्या बाबतची दुरुस्ती करू शकता. यातील एक पर्याय निवडून OK या बटनावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमचे नाव आणि इतर दुरुस्तीची माहिती भरून, आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे.

✅👉🏻 उद्योग आधार: उद्योग आधार रजिस्ट्रेशन Online

महाराष्ट्र मतदार यादी कशी चेक करायची: Maharashtra Voter List PDF

मतदार यादी PDF मध्ये Download हवी असेल तर तुम्हाला ती Download करता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला निवडणूक विभागाच्या STATE ELECTION COMMISSION MAHARASHTRA  या वेब पोर्टलवर जावे लागेल. इथे जाऊन तुम्ही तुमच्या विभागाची Voter List PDF मिळवू शकता.

Voter List PDF काढण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला STATE ELECTION COMMISSION MAHARASHTRA यांच्या https://mahasec.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला खाली तीन पर्याय दिसतील त्यामधील Voter Search या पर्यायावर गेल्या नंतर Search Your Name Click Here लला क्लिक करायचे आहे, त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर Download Voter List या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Download Voter List ला क्लिक केल्या नंतर Search Voter List नावाचे पृष्ठ open होईल त्या मध्ये Select list to Download या मद्ये येणाऱ्या पर्यायांमधून Final List हा पर्याय निवडायचा आहे. आणि त्या खालील बॉक्स मध्ये Select District मध्ये तुमचा जिल्हा, Select Local Body मध्ये दिसणाऱ्या पर्यायांमधून तुमची Local Body निवडायची आहे, त्या पुढील बॉक्स मध्ये Select Local Body Name निवडून Open PDF फाईल मधून तुम्ही तुम्हाला आवश्यक असणारी Maharashtra Voter List PDF Download करू शकता.

✅👉🏻 जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना: छोट्या उद्योगांना कर्ज भांडवल योजना

Voter List: मतदार यादी मध्ये तुमचे नाव शोधा

महाराष्ट्र राज्यातील मतदार यादी शोधण्यासाठी प्रथमतः तुम्हाला Election Commission of India च्या वेब पोर्टल वर जावे लागेल. या पोर्टलवरून तुम्ही तुमच्या भागातील मतदार यादी Download करू शकता, किंवा पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर गेल्यावर Search in Electoral Roll या पर्यायाला क्लिक करावे लागेल. या पर्यायाला क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला तीन पर्याय दिसतील

  • Maharashtra Voter List PDF  ईपीआईसी द्वारा खोजें / Search by EPIC
  • Maharashtra Voter List PDF  विवरण द्वारा खोजें/ Search by Details
  • Maharashtra Voter List PDF  मोबाइल द्वारा खोजें / Search by Mobile

या पर्यायांमधून एक पर्याय निवडून तुम्ही Voter List पाहू शकता.

ईपीआईसी द्वारा खोजें / Search by EPIC

या पर्याय मध्ये तुम्हाला पहिल्या रकान्यात भाषा निवडायची आहे Select Language या नंतर त्या खालील रकान्यात एका रकान्यात तुमचा EPIC Number टाकायचा आहे, तर दुसऱ्या रकान्यात राज्य/State निवडायचे आहे. हे निवडल्या नंतर सगळ्यात शेवटी Captcha Code Enter करून SEARCH  बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्या समोर तुमचे मतदार यादी प्रमाणे डीटीएल ओपन होईल.

विवरण द्वारा खोजें/ Search by Details

या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या नावाची पूर्ण डीटीएल टाकून तुमचे मतदार यादीत असलेले, नाव, तुमचा घर नंबर, तुमचा ऍड्रेस इत्यादी गोष्टी पाहू शकता.

मोबाइल द्वारा खोजें / Search by Mobile

या पर्यायामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून येणाऱ्या otp ला बॉक्स मध्ये भरून, तुमचे एकूण मतदान यादीतील डीटीएल मिळवू शकता.

voter id pvc card order online apply: PVC मतदार ओळखपत्र ऑनलाईन ऑर्डर करा

मतदार म्हणून नोंदणी असलेल्या नवीन मतदाराला निवडणूक विभागाकडून PVC कार्ड दिले जाते त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. मात्र जुनी नोंदणी असलेल्या मतदारांना ज्यांचे मतदार ओळखपत्र जुने आहे, अशा मतदारांना PVC मतदार ओळखपत्र ऑर्डर करता येते. त्यासाठी तुम्हाला निवडनू विभागाच्या वेबसाईटवर जाऊन apply pvc card वर क्लिक करून नवीन कार्ड ऑर्डर करू शकता, त्यासाठी तुम्हाला रु. ५० ची ऑनलाईन फीस भरावी लागते. त्या नंतर तुमचे PVC मतदार ओळखपत्र पोस्टाच्या साह्याने तुम्हाला घरपोच मिळते.

✅👉🏻Check Aadhaar Update Status: आधारकार्ड अपडेट स्थिती तपासा

Conclusion

महाराष्ट्र मतदार यादी कशी चेक करायची: Maharashtra Voter List PDF या लेख मध्ये आपण voter list कशी चेक करायची या बरोबरच मतदार यादीत नाव टाकणे, नाव व पत्ता दुरुस्ती इत्यादी मतदार ओळखपत्रा विषयीच्या सुविधा बद्दल पूर्ण माहिती पहिली. निवडणूक विभागाच्या पोर्टलवर जाऊन मतदार ओळखपत्रा विषयीच्या सर्व सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top