माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र हि महाराष्ट्र शासनाकडून 1 आगस्ट 2017 पासून महिला व बाल कल्याण विभाग मार्फत चालू करण्यात आली आहे. भ्रून हत्या रोकने, मुलीचे बालविवाह रोकने, मुलीला समाजात सन्मानाने जगण्यासाठी प्रेरित करणे. मुलींचे जन्मदर वाढविणे. मुली विषयी समाजात सकारात्मकता आणणे, मुलीच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन तथा मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे तसेच पालकांना आपल्या मुलीच्या संगोपनात सहकार्य करणे या उद्देशाने सदरील योजना महाराष्ट्र शासनाकडून चालू करण्यात आली. माझी मुलगी भाग्यश्री योजने अंतर्गत मुलीच्या जन्मा नंतर शासन 50,000 हजार मिडत ठेव रक्कम मुलीच्या नवे तिच्या खात्यावर जमा करते. त्या मुद्दल रकमेचे व्याज उचलण्याची परवानगी मात्र पालकांना शासन देते. ठराविक कालावधी नंतर मुद्दल रकमेवरील व्याज रक्कम उचलता येते.माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाकडून 1 आगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आली. मुलीच्या जन्मा पासूनच तिच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्यामुळे या योजनेला माझी मुलगी भाग्यश्री हे नाव देण्यात आले आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये आहे, अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेची पात्रता निकष व कागदपत्रे कोणते हे आपण पाहणार आहोत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे निकष

एक मुलीच्या जन्मा नंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास 

 • माता-पित्याने एक मुलीच्या जन्मा नंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असल्यास व तसे कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र दाखल केल्यास मुलीच्या नावे रु. 50,000 हजार रुपये मुद्दल ठेव जमा केली जाईल.
 • मुलीच्या नावे जमा केलेल्या रु. 50,000 हजार मुद्दल ठेवीवर मुलीचे 6 वर्ष वय झाल्यावर रकमेवरील फक्त व्याज काढता येणार आहे.
 • पुन्हा जमा असलेल्या मुद्दल  50,000 हजार रकमेवरील व्याज मुलीच्या वयाच्या 12 व्या वर्षी काढता येणार आहे.
 • मुलीच्या वय वर्ष 18 नंतर मुद्दल 50,000 हजार रक्कम आणि त्या रकमेवरील एकूण व्याज अशी एकत्रित रक्कम काढता येणार आहे.

दोन मुलीच्या जन्मा नंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास 

 •  दोन मुली असल्यास आणि माता-पित्याने दोन मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलीच्या नवे 25000-25000 हजार रुपये शासन मुद्दल ठेव जमा करते.
 • मुलीच्या वयाच्या 6 वर्षा नंतर रु. 25,000 हजार मुद्दल रकमेवरी व्याज काढता येणार आहे.
 • मुलीच्या 12 व्या वर्षी मुद्दल रकमेवरील व्याज पुन्हा काढता येयील.
 • मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी मुद्दल रक्कम आणि मुद्दल रकमेवरील एकूण व्याज अशी पूर्ण रक्कम एकत्रित काढता येयील.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे पात्रता निकष

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र या योजनेचे निकष काय आहेत हे आपण खाली पाहणार आहोत.

 1. माता/पित्याने मुलीच्या जन्मा नंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र योजनेचा लाभ गेण्याच्या अगोदर धाखल करावे.
 2. माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ 1 आगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या आणि नंतर जन्मलेल्या मुलींना होईल.
 3. माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत जर 1 आगस्ट 2017 पूर्वी एक मुलीचा जन्म झाला असेल आणि 1 आगस्ट 2017 नंतर दुसरी मुलगी जन्मली असेल तर सदरील योजनेचा लाभ दुसर्या मुलीला मुलीला घेता येयील.
 4. पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी असल्यास मुलीला लाभ घेता येयील, तसेच पहिली मुलगी असल्यास आणि दुसरा मुलगा असल्यास मुलीला लाभ घेता येयील.
 5. पालकांन तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लह घेता येणार नाही.
 6. योजनेचा लाभ घेणारे पिता हे मुळचे महाराष्ट्राचे रहिवाशी असावेत.
 7. या योजनेचा लाभ घेण्यासाठी माता/पिता यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र धाखल करणे आवश्यक आहे.
 8. ज्या मुलीच्या नावाने योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 9. मुलीच्या नवे जमा असलेली मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज अशी एकूण रक्कम उचलण्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आणि मुलगी 10 वी परिश उतीर्ण असणे तसेच अविवाहित असणे आवश्यक आहे.
 10. पहिल्या अपत्यानंतर ददुसऱ्या प्रसूती वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुली योजनेस पात्रअसतील.
 11. बाल गृहातील अनाथ मुली या योजनेस पत्र असतील, दत्तक माता/पित्यांना या योज्नेयाच्या आटी व शर्थी लागू असतील.
 12. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र मुलीच्या आधार कार्डशी जोडली जाईल.
 13. माझी कन्या भाग्यश्री योजनेची रक्कम मुलीचे 18 वर्षा पूर्वी लग्न झाल्यास किंवा 10 वी पास होण्यापूर्वी शाळेतून काढल्यास मुलीच्या आणि तिच्या आईच्या संयुक्त खात्यावर जमा असलेली रक्कम शासनाला परत केली जाईल .पण 10 वी पास होण्यापूर्वी मुलीचे निधन झाल्यास दरील रक्कम तिच्या माता/पित्याला इंयात येयील.
 14. कुटुंब प्रमुखाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 7.50 लाख एवढे असावे या पेक्षा जास्त असावे, तसे उत्पन्नाचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र कागदपत्र सोबत जोडावे लागेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

माझी कन्या भाग्यश्री  योजना महाराष्ट्र या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.

 1. माझी कन्या भाग्यश्री योजनेच लाभ घेणारा पिता हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र.
 2. मुलीचे आधार कार्ड.
 3. मुलीच्या पित्याचे आधार कार्ड.
 4. मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
 5. माता/पिता यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र.
 6. रेशन कार्ड.
 7. मुलीचे आणि तिच्या आईचे संयुक्त बँक खाते.
 8. पित्याचे एकूण उत्पन्न 7.50 लाख पेक्षा जास्त नसल्याचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र.
 9. मुलीचे 10 वी पास झाल्याचा दाखला. ( शेवटची रक्कम उचलण्यासाठी ).
 10. मुलगी शाळा शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र.

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे वरील प्रमाणे आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील कागदपत्रांची पूर्तता करून आणि अर्ज पूर्ण भरून दाखल करावा. अर्ज कुठे दाखल करायचा ते आपण पुढे पाहू.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कुठे करायचा 

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र या योजने अंतर्गत तुम्ही तयार केलेला अर्ज पूर्ण कागदपत्रासह तुमच्या अंगणवाडी शिक्षिकेकडे जमा करू शकता. तो अर्ज अंगणवाडी शिक्षिका पुढे सदरील विभागाच्या कार्यलायला पोह्च्त करतील आणि तुम्हाला त्या अर्जाची पोहोच पावती आणून देतील.

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या Online माहितीसाठी

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र या योजनेच्या Online माहितीसाठी महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकृत पोर्टल ला भेट दया. पोर्टल ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा  

Conclusion

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र या blog मध्ये आपण माझी कन्या भाग्यश्री योजनेची संपूर्ण माहिती पहिली आहे. सारील लेखाच्या माहितीद्वारे तुम्ही या योजनेसाठी प्रस्ताव तयार करू शकता आणि या योजनेचा लाभ घेवू शकता. मुलीला जन्मताच भाग्यवान बनवणारी हि योजना आहे. माहिती आवडली असल्यास शेअर करा. आम्हाला फॉलो करा. आमच्या telegram ग्रुप मध्य सामील होण्यासाठी क्लिक करा.

2 thoughts on “माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र”

Comments are closed.

Scroll to Top