महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण या योजने बरोबरच लाडका भाऊ हि योजना महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेतू महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाहीतर बेरोजगार भत्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळालेल्या लाडकी बहीण योजने नंतर लाडका भाऊ योजना ही बेरोजगार तरुणांसाठी फायद्याची ठरत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम किंवा बेरोजगार भत्ता असे स्वरूप असल्याने बेरोजगार तरुणांना हि योजना आकर्षित करीत आहे. आज आपण या योजनेला Online अर्ज कुठे करायचा या बद्दल जाणून घेणार आहोत.
लाडका भाऊ योजना
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजने बरोबरच राज्यातील भावांसाठी सुरु केलेली लाडका भाऊ योजना ही राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेतून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे, आणि ज्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नाही अशा तरुणांना बेरोजगार भत्ता शासनाकडून सरळ त्यांच्या बँक खात्यात दिला जाणार आहे. लाभार्थी हा १ २ वि. पास, पदवीधर किंवा डिप्लोमाधारक असावा लागतो. ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ याच योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून संबोधले जाते.
लाडका भाऊ योजना Online Apply
लाडका भाऊ योजना म्हणजेच राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कायय प्रशिक्षण योजना होय, याच योजनेला नंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ असे नाव देण्यात आलेले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम शासनाच्या रोजगार स्वयंम या पोर्टल वरती जावे लागेल. या योजनेस पात्र असल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी लागेल. ऑनलाईन नोंदणी झाल्या नंतर, तुम्हाला मिळालेल्या ID आणि PASSWORD च्या साह्याने तुम्ही पुढील फॉर्म भरू शकता.
लाडका भाऊ योजना पात्रता व विद्यावेतन
मुख्यमंत्री युवा कायय प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या योजनेची पात्रता पुढील प्रमाणे आहेत .
- १ २ वि पास – ६ ,० ० ० हजार रुपये
- ITI /डिप्लोमा – ८ ,० ० ० हजार रुपये
- पदवीधर /पदव्यूत्तर – १ ० ,० ० ० हजार रुपये
पात्रता
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- उमेदवाराचे वय हे १ ८ ते ३ ५ च्या दरम्यान असावे.
- उमेदवार हा १ २ वि पस, ITI उत्तीर्ण, डिप्लोमा होल्डर, पदवीधर, पदव्यूत्तर पूर्ण केलेला असावा.
सारांश
लाडका भाऊ योजना Online Apply: लाडका भाऊ योजनेसाठी असा करा Online अर्ज या लेखात आपण लाडका भाऊ योजना काय आहे आणि पात्रता काय आहेत या विषयी पूर्ण माहिती पहिली माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नटे वाइकांना अवश्य शेअर करा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.