दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या, मुंबई / महारष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग यांच्या माध्यमातून दिव्यांगासाठी योजना राबविल्या जातात. दिव्यांगाना व्यवसाय उपलब्ध व्हावा आणि त्या द्वारे त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने शासन हि योजना राबवीत आहे. दिव्यांगाना उदरनिर्वाह चे साधन निर्माण करण्यासाठी शासन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या, मुंबई / महारष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग यांच्या माध्यमातून दिव्यांगाना फिरते मोबाईल शॉप ई व्हेईकल खरेदी करून देत आहे. सदरील योजनेसाठी पात्रता-आटी आणि कागदपत्रे या विषयी आपण सविस्तर माहिती या blog द्वारे घेणार आहोत. दिव्यांग योजना महाराष्ट्र शासन कशी राबविते ते आपण पाहू.
दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना
महाराष्ट्र शासनाकडून महारष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग यांच्या कडून (अपंग ) दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ऑन व्हेईकल योजना राबवीत आहे. दिव्यांगांना खाद्यपदार्थ व्यवसाय, किरकोळ व्यवसाय, वाहतूक व्यवसाय, फिरते दुकान इत्यादीसाठी ई व्हेईकल उपलब्ध करून देणार आहे. या योजनेच्या पात्रता व आटी काय आहेत आणि कोणकोणती कागदपत्रे या योजनेला लागतात ते आपण पुढे पाहू.
दिव्यांग योजना महाराष्ट्र शासन पात्रता व आटी
- दिव्यांग लाभार्थी हा महाराष्ट्राचा कायम स्वरूपी रहिवाशी असावा.
- अर्जदाराकडे दिव्यांगाचे किमान ४०% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असावे.
- अर्जदार दिव्यांगाचे व १८ ते ५५ वर्ष असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखाच्या वर नसावे.
- दिव्यांग अर्जदार हा शासकीय किंवा निमशासकीय शेवेत नसावा.
- सदरील योजनेत जास्त दिव्यांगाला निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
- अति दिव्यांगाकडे वाहन परवाना नसला तरी सोबतच्या साकार्याच्या साह्याने फिरते मोबाईल शॉप व्यवसाय करण्यास ई व्हेईकल घेण्यास पात्र राहील.
- अर्जदाराला सर्व आटी मान्य असल्याचे आणि दिलेल्या वाहनाची काळजी घेण्याचे बंधपत्र विभागाला सदर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर थकबाकीदार नसावा.
हे हि वाचा 👉🏻 बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits
दिव्यांग योजना महाराष्ट्र शासन कागदपत्रे
- दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय घटकात येत असल्यास जातीचा दाखला.
- अर्जदाराचे Domacile Cartificate/अधिवास प्रमाणपत्र.
- अर्जदार पत्त्याचा पुरावा : – 1) रेशन कार्ड 2) ड्रायविंग लायसन्स 3) वीज बिल 4) इलेक्शन कार्ड 5) मालमत्ता कर पावती 6) पासपोर्ट
- अर्जदाराचे अपंग प्रमाणपत्र ४०% किवा त्यावरील असावे.
- अर्जदाराचा ओळखीचा पुरावा :- 1) पॅन कार्ड 2) ड्रायविंग लायसन्स 3) रेशन कार्ड 4) इलेक्शन कार्ड 5) आधार कार्ड 6) पासपोर्ट 7) नरेगा जॉब कार्ड.
- अर्जदाराचे बँक पासबुक.
- अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र.
- पासपोर्ट साईज फोटो.
दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना हि महाराष्ट्रातील अपंग लाभार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाकडून राबविली जात आहे. वरील प्रमणे पात्रता-आटी आणि कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहे.
हे हि वाचा 👉🏻 Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड
असा करा online अर्ज
दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना या योजनेसाठी online अर्ज स्वीकारले जातात. महारष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागाच्या साईट वर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून Login करावे लागते. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP त्या खालील रकान्यात टाकून प्रविष्ट केल्या नंतर तुमचा पुढील फॉर्म Open होतो. फॉर्म Open झाल्या नंतर त्यावर सर्व प्रथम तुमचे नाव, आईचे नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ई मेल आय डी टाकावा लागतो. त्या नंतर दिलेल्या योग्य पर्यायावर टिक मार्क करून पुढील फॉर्म भरायचा आहे. तुमचा पूर्ण पत्ता, पालक किंवा सहाय्यक यांचा तपशील, व्यवसाय श्रेणी इत्यादी.
तुम्हाला ठराविक बॉक्स मध्ये तुमचे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत जसे कि, अर्जदाराचा जातीचा दाखला, अदिवास प्रमाणपत्र, अर्जदाराचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे बँक पासबुक, प्रतिज्ञा पत्र इत्यादी महत्वाचे कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. अर्ज करण्यासाठी महारष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागाची अधिकृत साईट 👉🏻 https://evehicleform.mshfdc.co.in/
Conclusion
दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना या लेखा मध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या महारष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग मार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगासाठी च्या योजनेबद्दल पूर्ण माहिती पहिली, योजनेची पात्रता-आटी, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या बद्दल तसेच या योजनेसाठी Online अर्ज कसा करायचा याची पूर्ण प्रोसेस पहिली. आता वरील blog च्या माहितीआधारे तुम्ही सदरील योजनेसाठी स्वतः अर्ज करू शकाल. अश्याच योजनांच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. आमच्या telegram ग्रुप मध्ये सामील व्हा.