Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती अशी तपासा

Www Mahabocw In Renewal Status:- शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून कामगार हिताच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. कामगाराचा आर्थिक सामाजिक स्तर उंचवावा म्हणून सदरील मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्य विषयीच्या योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगार मंडळाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कामगार मंडळाकडे कामगार म्हणून नोंदणी करावी लागते. नोंदणी नंतर तूम्हाला मंडळ १४ अंकी ऑनलाईन देते, त्या द्वारे तुम्ही मंडळाच्या इतर योजनांचा फायदा घेऊ शकता. मंडळाकडून अनेक आर्थिक लाभाच्या योजना कामगारांसाठी राबविल्या जातात. मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी केल्या नंतर दर १२ महिन्याला सदरील नोंदणी हि Renew करावी लागते. Renew केलेल्या नोंदणीची सद्य स्थिती Renewal Status कसे तपासायचे ते आपण पाहू.Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती अशी तपासा

Www Mahabocw In Renewal: कामगार रिन्यूअल

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या ऑफिशियल वेबसाईट. www.mahabocw.in वर जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईन नोंदणी करू शकता. नोंदणी केल्या नंतर तुम्हाला मंडळाच्या नियमा नुसार दर १२ महिन्याला आपली ऑनलाईन नोंदणी Renew करावी लागते. तुम्ही कामगार म्हणून सद्य स्थितीत काम करत आहात, हे Renew द्वारे कामगार मंडळाला माहिती द्यावी लागते. Renew करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ते आपण पुढे पाहू.

✅👉🏻 आदिवासी लोन योजना महाराष्ट्र: Shabari Loan Scheme

Mahabocw Online Renewal Process/ असे करा ऑनलाईन रिन्यू

कामगार मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी केल्या नंतर कामगाराला नोंदणी केल्या नंतर ती नोंदणी दर १२ महिन्याला renew करावी लागते. Renew करण्यासाठी काय करावे लागते ते आपण पाहू.

सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या www.mahabocw.in या वेबसाईटवर जावे लागेल. साईटवर गेल्यानंतर Construction Worker Online Renewal या पर्यायाला निवडावे लागेल. या पर्यायाला क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक बॉक्स दिसेल त्या बॉक्स मध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील New Renewal आणि Upadte Renewal नवीन रिन्यूसाठी तुम्हाला New Renewal हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला तुमचा रजिस्टेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्टेशन नंबर टाकल्या नंतर Proceed To Form वर क्लिक करायचे आहे.

Proceed To Form क्लिक केल्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर OTP येईल ती भरून तुमचा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्म वर तुम्हाला इतर माहिती भरून तुमचे काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आणि फॉर्म सबमिट करावा लागेल. तुमची रिन्यू ची प्रोसेस पूर्ण होताच, तुम्हाला SMS द्वारे कळवले जाईल. पुढील ७ दिवसात तुमचे रिन्यूअल पूर्ण होईल. रेन्युअल मध्ये काही त्रुटी असल्यास त्या तुम्हाला SMS द्वारे किंवा तुमची प्रोफाईल लोगिन केल्या नंतर दिसून येयील.

Renewal करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कामगारांचे १४ अंकी रेजिस्टेंशन नंबर ( कार्ड ).
  • आधार कार्ड.
  • ९० दिवस कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र.

✅👉🏻  Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Www Mahabocw In Renewal Status: कामगार रिन्यूअल स्थिती चेक करा

कामगार विभागाच्या mahabocw.in  या वेबसाईट व रिन्यू केल्या नंतर तुम्हाला तुमची नोंदणी रिन्यू झाली किंवा नाही हे पाहता येते. तुम्ही रिन्यू केल्या नंतर महामंडळाकडून तुम्हाला SMS द्वारे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर कळवले जाते. Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती अशी तपासा

Renewal Status चेक करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या Construction Worker:Profile Login ( प्रोफाईलवर लॉगिन) करावे लागेल. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्या नंतर येणारी OTP भरून तुमची प्रोफाइल ओपन होईल. तुमच्या प्रोफाइल वर तुमचे नाव आणि इतर माहिती असते त्याच बरोबर Acknowledgement Number आणि Registration Number असतो.

Construction Worker:Profile Login केल्या नंतर प्रोफाइल फॉर्म वर Renewals म्हणून पर्याय येतो त्याला क्लिक करताच तुम्ही तुमचे Renewal Status पाहू शकता. रिन्यूअल चा पिरियड पूर्ण झाला नसेल किंवा काही त्रुटी असल्यास Renewals Status मध्ये तुम्हाला दिसून येईल. रेन्युअल दर 12 महिन्याला करावे लागते, तुमच्या रेन्युअल ची तारीख तुमच्या प्रोफाईल वर असते. तुमचे रेन्युअल झालेले असल्यास Status हिरव्या रंगत Active म्हणून दिसते.

✅👉🏻महिला कर्ज योजना: शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात

Conclusion

Www Mahabocw In Renewal Status: कामगार रिन्यूअल स्थिती चेक करा या लेखामध्ये तुम्ही आम्ही तुम्हाला Online Renewal Status कसे चेक करायचे ते सविस्तर सांगितले. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील चेक करू शकता. कामगार विभागाच्या नोंदणी नंतर दर १२ महिन्याला नोंदणी रिन्यू करावी लागते. नोंदणी रिन्यू केल्या नंतर status कसे चेक करायचे ते आपण पहिले. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣  आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

✅👉🏻 Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

Scroll to Top