BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा

BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा बांधकाम कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेले इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे राज्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या असंघटीत बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबवीत असते. बांधकाम कामगाराच्या सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी मंडळाकडून या योजना चालविल्या जातात. या योजनांमधून बांधकाम कामगारांची प्रगती साधली जावी हा उद्देश या माघचा शासनाचा आहे. इतर घटकांबरोबर बांधकाम कामगारांना हि सामाजिक प्रगती आणि सुरक्षा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची अर्ज केल्या नंतर स्थिती कुठे आणि कशी तपासायची या बद्दल माहिती आपण सदरील लेखा मध्ये पाहणार आहोत. अर्ज केल्या नंतर आपला अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाला हे आपल्याला कसे तपासता येयील ते आपण पाहणार आहोत.BOCW Status Check Mahabocw: बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा

✅👉🏻 माझी नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/ The Best Tips For Job

Mahabocw बांधकाम कामगार योजना

महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून राज्यातील असंघटीत बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगारांसाठी आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक स्वरूपाच्या योजना महामंडळाकडून चालविल्या जातात. बांधकाम कामगारांना समाजातील इतर घटकाबरोबर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे तुम्हाला online नोंदणी करावी लागते, नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला मंडळाकडून 14 अंकी Registration Numbe मिळतो. हा नंबर मिळाल्या नंतर तुम्ही कामगार विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेवू शकता. नोंदणी केल्या नंतर तुम्हाला दर 12 महिन्याला ती नोंदणी Renew करावी लागते.

✅👉🏻 Annasaheb Patil Loan Apply Online: अण्णासाहेब पाटील ऑनलाईन कर्ज नोंदणी

Mahabocw बांधकाम कामगार विभागाच्या योजनाचा लाभ कसा मिळतो

शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजनांसाठी तुम्हाला मंडळाच्या mahabocw.in या वेबसाईट वर जावून Online अर्ज करावा लागतो. या वेबसाईट वर आल्या नंतर Construction Worker: Apply Online for Claim या पर्यायाला निवडून New Claim वर क्लिक करून तुम्ही नवीन योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा Registration Numbe आणि मोबाईल नंबर ची आवश्यकता असते. अर्ज भरल्या नंतर तुम्हाला तिथे काही संबधित कागदपत्रे Upload करावी लागतात.

✅👉🏻व्यवसाय कर्ज योजना:वीणा तारण वीणा जामीन मिळवा कर्ज

BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा

इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे योजनांच्या लाभासाठी Online अर्ज केल्यानंतर आपला अर्ज मंजूर आहे किंवा नाही, हे आपल्याला माहित करून घेणे आवश्यक असते. तुम्ही केलेल्या योजनासाठीचा अर्ज मंजूर आहे किंवा नाही, अथवा त्रुटी मध्ये आहे हे आपल्या अर्जाचे Status मंडळाकडून तुम्हाला SMS द्वारे तुमच्या Registred मोबाईल नंबर वर कळविले जाते. पण एखाद्या वेळेस SMS नाही आला किंवा इतर कारणाने SMS नाही मिळाला, तर आपल्या आपल्या योजनेचे Online Status Check कसे करायचे ते आपण पाहू.

प्रथमतः तुम्हाला महामंडळाच्या mahabocw.in या वेबसाईटवर जावून आपल्या Construction Worker:Profile Login या पर्यायाला निवडावे लागेल. या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून Otp घ्यावी लागेल ती OTP भरल्या नंतर तुमची Profile तुमच्या समोर Open होईल.

Profile Open झाल्यावर त्यावर तुमचे नाव, तुमची जन्म तारीख, तुमचा Acknowledgement Number, तुमचा Registration Number, Registration Date, या बरोबरच उजव्या साईडला मोबाईल नंबर, तुमचे वय, तुमची वैवाहिक स्थिती, Category इत्यादी बरोबरच तुमचे Application Status आणि Registration Status दिसेल तुमचे Renewal झाले असेल तर तिथे accept आणि active हे हिरव्या रंगात दिसतील. या द्वारे तुम्ही तुमच्या नोंदणीचे Status Check करू शकता.

योजनेसाठी केलेल्या अर्जाचे Status Check कसे करायचे

कामगार मंडळाच्या योजनांसाठी Online अर्ज केल्या नंतर तुम्ही तुमच्या अर्जाचे Online Status Check करू शकता. ते कसे Check करायचे ते आपण पाहू.BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा

तुमची कामगार मंडळाची Construction Worker:Profile Login लॉगीन केल्या नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म वरील सर्व Details दिसतील त्याच बरोबर तुम्हाला Claim नावाचे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही योजनेसाठी केलेल्या अर्जाची पूर्ण Detaile तिथे दिसेल. तुमचा योजनेचा अर्ज, तुमच्या अर्जाचा पावती क्रमांक या बरोबरच तुम्हाला तिथे तुमच्या योजनेच्या अर्जाचे Status हि दिसेल. तुमचा अर्ज मंजूर आहे किंवा नामंजूर आहे किंवा त्रुटित आहे, हे सर्व Detaile तुम्ही Status मध्ये Check करू शकता.

✅👉🏻 Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

Conclusion

BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा या लेखा मध्ये आपण बांधकाम कामगार Mahabocw योजनेचे Status कसे Check करायचे या बद्दल संपूर्ण माहिती पहिली. कामगार मंडळाच्या विविध योजनेसाठी केलेल्या अर्जाचे Status Check तुम्ही इथे करू शकतात. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top