CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ( Chief Minister Employmet Generation Programme ) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत CMEGP e पोर्टल द्वारे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला जातो. महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी कमि करण्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाच्या CMEGP Scheme मधून साह्य केले जाते. सदरील योजनेमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला/माझी सेनिक यांना विशेष प्राधान्य दिले जाते. तसेच ग्रामीण व शहरी अशा दोन भागात वेगवेगळ्या संथा मार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाते. ग्रामीण व शहरी भागासाठी दिला जाणारा निधी हा शहरी आणि ग्रामीण असे निकष लावून दिला जातो. महिला बचत गट यांना संयुक्तिक संस्था ग्रह्य धरून घटक मागणीसाठी निधी दिला जातो. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागासाठी वेगवेगळ्या दोन संस्था या योजनेची अंमलबजावणी करतात.CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना विषयी आपण या blog मध्ये माहिती पाहणार आहोत. CMEGP Scheme चा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता, निकष आणि online prosess या विषयी जाणून घेणार आहोत.

✅👉🏻 जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना: छोट्या उद्योगांना कर्ज भांडवल योजना

CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

महराष्ट्र शासनाने सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट, अपंग, कुटुंब प्रमुख महिला यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरु केलेली आहे. या योजनेमधून लघु उद्योग, शुक्ष्म उद्योग उभारणीसाठी वेयक्तिक किंवा संस्थे मार्फत अनुदान घेता येते. शासनाने 2019-2020 च्या नवी ओद्योगिक धोरण नुसार “CMEGP e पोर्टल” हि महात्वाकांशी योजना सुरु केली आहे.

लाभासाठी कोण पात्र आहे.

CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने मध्ये कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवाशी ज्यांचे वय 18 ते 45 दरम्यान आहे. ( मागासवर्गीय लाभार्थ्यांना वयाची अट 5 वर्ष शिथिल आहे ) घटकाचा लाभ घेताना 10 लाखावरील प्रकल्पासाठी शेक्षणिक पात्रता 7 वी पास आहे तर 15 लाखावरील प्रकल्प अहवालासाठी 10 वी पास असणे आवश्यक आहे.

वेयक्तिक लाभार्थी स्वतः उद्योग-व्यवसायासाठी इच्छुक असलेले कोन्हीही या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याच बरोबर बचतगट वेशेशतः महिला बचतगट पण या योजनेसाठी अर्ज करू शकतात.वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले महिला बचतगट यांना या योजनेतून विशेष प्राधान्य दिले जाते. आणि शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्था हि या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

केंद्र शासनाच्या PMEGP अथवा तत्सम केंद्र आणि राज्यशासनाच्या अन्य विभागाकडून अनुदानावर आधारित स्वरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

✅👉🏻 पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत येणाऱ्या उद्योगांची यादी: PMEGP उद्योग लिस्ट

CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून करता येणारे उद्योग-व्यवसाय

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी भागाच्या स्थानिक पातळीवर चालणार्या लगू उद्योगआणि शुक्ष्म उद्योग उभारणीसाठी अनुदान आले जाते.

पात्र असलेले उद्योग-व्यवसाय

  • शेवा उद्योग.
  • कृषिपूरक व्यवसाय.
  • कृषी आधारित उद्योग.
  • ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय.
  • विक्री केंद्रे.
  • फिरते विक्री केंद्रे.
  • खाद्य अन्न केंद्रे.

इत्यादी घटक CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अतर्गत शासनाकडून पात्र ठरवण्यात आलेले आहेत.

✅👉🏻 ग्रामीण भागातील व्यवसाय: ग्रामीण भागात करता येणारे उद्योग व्यवसाय

प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण

घटकांचा प्रवर्ग घटकाची स्व गुंतवणूक देय अनुदान
शहरी
देय अनुदान
ग्रामीण
बँक कर्ज
शहरी
बँक कर्ज
ग्रामीण
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला/अपंग/माझी सेनिक 5% 25% 35% 70% 60%
उर्वरित प्रवर्ग 10% 15% 25% 75% 65%

वरील प्रमाणे मागासवर्गीय प्रवर्गासाठी आणि उर्वरित प्रवर्गासाठी शासनाचे अनुदान रक्कम व बँकेचे कर्ज लाभार्थ्यांसाठी ठरलेले आहे.

CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना घटक उद्दिष्ठ

महराष्ट्र शासनच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला यासाठी राखीव स्वरुपात घटक कोठा ठेवण्यात आलेला आहे.महिला प्रवर्गासाठी- 30% तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती- 20% घटक राखीव आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी शासनाने सबंधित विभाग सामाजिक न्याय व विशेष साह्यता विभाग आणि आदिवासी विकास विभाग या साबंधीत्तेची तरतूद उपलब्ध करून दिली आहे.

कार्यक्रम अंमलबजावणी संस्था

महाराष्ट्र शासनाने CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना प्रभावी पाने राबविण्यासाठी संस्थेच्या निवडी केल्या आहेत, ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी दोन वेगवेगळ्या संस्था निर्गमित केल्या आहेत. ग्रामीण भागासाठी 20,000 लोकसंख्या पेक्षा कमी शेत्रासाठी खाडी ग्रामुध्योग मंडळउर्वरित भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र या कर्यक्रम अमलबजावणी संस्था म्हणून काम करतील अशे ठरवून दिले आहे.

अर्ज करण्यासाठी online prosess

महाराष्ट्र शासनाच्या CMEGP e पोर्टल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या पोर्टल वर गेल्यानंतर चार पर्याय आपल्या समोर असतात, त्या पर्यायामधून तुम्ही ज्या पर्यायासाठी पात्र आहात त्या पर्यायावर जावून तुम्ही तुमचा online form भरू शकता. पुढील प्रमाणे चार वेगवेगळे पर्याय असतात ते आपण पाहू.CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

  • व्यक्तीसाठी online अर्ज :- वयक्तिक लाभासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याने हा पर्याय निवडायचा आहे.
  • व्यक्तीक नसलेल्यासाठी form:- व्यक्तीक नसलेल्या म्हणजेच नोंदणीकृत संस्था किवा वित्तीय संस्था मान्य बचतगट यांनी हा पर्याय निवडून फॉर्म भरायचा आहे.
  • अर्जदराचा फीडबॅक फॉर्म :- अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या फॉर्म ची स्थिती पाहण्यासाठी हा पर्याय आहे.
  • नोंदणीकृत लाभार्थ्यासाठी लॉगीन फोर्म :- नोंदणी झालेल्या लाभार्थींना या पर्यायातून लॉगीन करता येते.

इतर दिलेले पर्याय हे CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या कामासाठी निर्गमित केलेल्या संस्था आणि पोर्टल च्या आॅफीसीयल लॉगीन साठी आहेत. online फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेब साईट CMEGP Portal ला भेट द्या.

आवश्यक कागदपत्रे

1 ) लाभार्थ्याचे 2 फोटो.

2 ) आधार कार्ड.

3 ) पॅन कार्ड.

4 ) जातीचा दाखला.

5 ) शैक्षनीक प्रमाणपत्र/ गुणपत्रिका.

6 ) जन्म प्रमाणपत्र/ अधिवास प्रमाणपत्र.

7 ) विशेष श्रेणी प्रमाणपत्र ( अपंग/माझी सेनिक )

8 ) प्रकल्प अहवाल.

9 ) विवाह प्रमाणपत्र.

10 ) लोकसंख्या प्रमाणपत्र ( ग्रामीण असल्यास ).

इत्यादी कागदपत्रे CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना online फॉर्म भरण्यासाठी लागतात.

Conclusion

CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या लेखा मध्य आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेविषयी पूर्ण माहिती पहिली. वरील दिल्या प्रमाणे आपण online पद्धतीने सदरील योजनेचा लाभ घेवू शकता. online Prosess आणि लागणारी कागदपत्रे या विषयी डिटेल माहिती आपण घ्रेत्लेली आहे. महाराष्ट्र शासनाची हि योजना इतर गरजू पर्यंत पोहचविण्यासाठी हा blog शेअर करा, आम्हाला फॉलो करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Telegram ग्रुप मध्ये सामील व्हा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना”

  1. Pingback: महिला कर्ज योजना: शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात

Comments are closed.

Scroll to Top