Driving Licence Apply:- भारतात वाहतूक नियमानुसार तुम्हाला कोणतीही गाडी चालविण्यासाठी तुमच्याकडे Driving Licence असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी गाडी चालविण्यास अपात्र आहात. भारतात रस्ते वाहतुकीसाठी शेप्रेट कायदा बनविण्यात आलेला आहे. तुमच्या गाडी विषयीच्या आणि लायसन्स विषयीच्या सर्व शेवा आणि नियम शासनाच्या R. T. O. खात्यामार्फत तयार व अमलात आणल्या जातात. तुम्हाला तुमचे स्वतः चे दोन चाकी अथवा चार चाकी किंवा लोडींग व्यावसायिक वाहन चालवायचे असल्यास तुम्हाला सर्व प्रथम R. T. O. विभागाकडून वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच Driving Licence काढणे आवश्यक आहे. आज आपण हे Driving Licence Apply कुठल्याही एजंटला पैसे न देता कसे काढता येते या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Driving Licence Apply/ लायसन्स काढा घरबसल्या
Driving Licence काढण्यासाठी आता कुठल्या एजंट कडे जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, तुम्हीं घरच्याघरी तुमच्या Learners License साठी Online अर्ज करू शकता. घरच्याघरी अर्ज करून तुमचे पैसे आणि वेळ ही वाचवू शकता. आपल्या मोबाईल, कॉम्पुटर किंवा लॅपटॉप द्वारे तुम्ही तुमच्या Driving Licence साठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र शासनाने Parivahan पोर्टलद्वारे सर्व RTO सेवा Online उपलब्ध करून दिल्या आहेत. या Parivahan portal मार्फत तुम्ही इतर शेवा जसे की, Fancy Number मिळविणे आणि यासारख्या इतर शेवा तुम्ही मिळवू शकता.
RTO विभागाच्या सर्व Online शेवा मिळविण्यासाठी तुम्हाला Parivahan विभागाच्या https://sarathi.parivahan.gov.in वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला Driving Licence साठी अर्ज आपल्या मोबाईलवर किंवा कॉम्पुटर वरून करता येईल. अर्ज कसा करायचा ते आपण पुढे पाहू.
Apply Driving Licence Online/असा करा ऑनलाईन अर्ज
Driving Licence अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या MINISTRY OF ROAD TRANSPORT & HIGHWAYS यांच्या Parivahan Sewa या वेब पोर्टल व जावे लागेल. या पोर्टलवरती आल्या नंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या पर्यायांमधून Online Services यावरती जाऊन Driving License Related Services या पर्यायाला निवडावे लागेल. त्या नंतर खाली दिसणाऱ्या पर्यायांमधून Drivers/ Learners License या पर्यायाला निवडावे लागेल.
Drivers/ Learners License या पर्यायाला निवडल्या नंतर Open होणाऱ्या पेजवर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. राज्य निवडल्यानंतर Learners License या पर्यायावरती क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक केल्या नंतर तुम्हाला नवीन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करा.
शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करत असतांना Apply For a New Learner License हा पर्याय निवडा. या पर्याय मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा मोबाईल नंबर भरून येणारी OTP सत्यापित करावी लागेल. तुम्ही तुमची वैक्तिक पूर्ण माहिती भरल्या नंतर NEXT या बटनावर क्लिक करून अर्जाची फी भरा. RTO कडून घेण्यात येणाऱ्या चाचणीसाठी तुमच्या सोयीची तारीख निवडा. दिलेल्या तारखेला RTO ऑफिस ला हजार राहून चाचणी पूर्ण करा. चाचणी पूर्ण केल्या नंतर तुम्हाला Learners Driving Licence दिले जाईल.
Driving Licence Online Apply/ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईटला क्लिक करा
https://sarathi.parivahan.gov.in
Concluion
Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज या लेखामध्ये आपण Driving Licence साठी online अर्ज कसा कार्याचा या बदल पूर्ण माहिती पहिली. शासनाच्या Parivahan Sewa या पोर्टलवर जाऊन तुम्ही Driving Licence साठी घरबसल्या अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला RTO एजंट कडे जाऊन पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.
🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.