Education Portal: SWAYAM Free Online Education, इयत्ता 9 वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व अभ्यासक्रम तुम्हाला कधीही, कुठेही प्रवेश करता येतो

Education Portal: SWAYAM Free Online Education: SWAYAM हा भारत सरकारने सुरु केलेला कार्यक्रम आहे. सर्वोत्कृष्ठ उद्यापन संसाधने सर्वांपर्यंत पोहचावे हा या पोर्टल मागचा उद्देश शासनाचा आहे. जे विध्यार्थी डिजिटल क्रांती पासून लांब आहेत अशा विध्यार्थ्यांना ज्ञान आणि अर्थवेवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे, आणि डिजिटल विभाजन कमी करणे हा या मागचा उद्देश शासनाचा आहे. आधुनिक शैक्षणिक सोयी सुविधेपासून वंचित असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी शासन निरनिराळे उपक्रम आणि कार्यक्रम राबवित असते. आधुनिक शिक्षणाचा लाभ सर्वांना भेटावा या साठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. अशाच प्रयत्नातून शासनाने SWAYAM  शिक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम (भारत सरकार) सुरु केलेला आहे. याच SWAYAM पोर्टल विषयी आपण माहिती पाहणार आहोत. हे पोर्टल काय आहे, विध्यार्थ्यांसाठी या मध्ये कोणते अभ्यासक्रम आहेत या बद्दल महती पाहणार आहोत.Education Portal: SWAYAM Free Online Education

Education Portal: SWAYAM Free Online Education

SWAYAM हा  भारत सरकारने सुरू केला एक कार्यक्रम आहे आणि शैक्षणिक धोरणाची तीन मुख्य तत्त्वे उदा., प्रवेश, समानता आणि गुणवत्ता साध्य करण्यासाठी तयार केलेले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सर्वात वंचित घटकांसह, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संसाधने सर्वांपर्यंत पोहचविणे हा आहे. SWAYAM Free Online Education द्वारे जे विद्यार्थी आज पर्यंत डिजिटल क्रांती पासून दूर आहेत. आणि ज्ञान व अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी निर्माण झालेली दरी कमी करण्याचा प्रयत्न करते.

SWAYAM हे एक प्लॅटफॉर्म आहे, जे सर्व अभ्यासक्रम सुविधा उपलब्ध करून देते, इयत्ता 9 वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत वर्गात शिकवले जाणारे सर्व अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात कोणालाही कधीही, कुठेही प्रवेश करता येतो. सर्व अभ्यासक्रम एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांनी तयार केले आहेत, आणि कोणत्याही विद्यार्थ्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी देशभरातील 1,000 हून अधिक विशेष निवडक प्राध्यापक आणि शिक्षक सहभागी झाले आहेत.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

सर्वोत्कृष्ठ शैक्षणिक सामग्रीची निर्मिती करण्यासाठी खालील नऊ समन्वयकाची नियुक्ती

  • AICTE (All India Council for Technical Education) for self-paced and international courses
  • NPTEL (National Programme on Technology Enhanced Learning) for Engineering
  • UGC (University Grants Commission) for non technical post-graduation education
  • CEC (Consortium for Educational Communication) for under-graduate education
  • NCERT (National Council of Educational Research and Training) for school education
  • NIOS (National Institute of Open Schooling) for school education
  • IGNOU (Indira Gandhi National Open University) for out-of-school students
  • IIMB (Indian Institute of Management, Bangalore) for management studies
  • NITTTR (National Institute of Technical Teachers Training and Research) for Teacher Training programme

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

SWAYAM Education- पात्रता

  1. स्वयंम अंतर्गत अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  2. ज्या विध्यार्थ्यांना SWAYAM प्रमाणपत्र हवे आहे, त्यांनी शुल्क भरून येणाऱ्या अंतिम परीक्षांसाठी नोंदणी करावी आणि निर्दिष्ट तारखेला प्रत्येक्ष केंद्रावर हजर राहावे.
  3. प्रमाणपत्रासाठीचे पात्रता अभ्यासक्रमाच्या पृष्ठावर घोषित केली जाईल आणि निकष जुळले तरच विध्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळेल.
  4. या अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट ट्रान्सफरला मान्यता देणारी विद्यापीठे/कॉलेज या अभ्यासक्रमांमध्ये मिळालेले गुण/प्रमाणपत्र यासाठी वापरू शकतात.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

क्रेडिट ट्रान्सफर

UGC ने आधीच  ( SWAYAM द्वारे ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट फ्रेमवर्क ) विनियम 2016 जारी केले आहे, ज्यात विद्यापीठांना असे अभ्यासक्रम ओळखण्याचा सल्ला दिला आहे जेथे क्रेडिट्स विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक रेकॉर्डमध्ये हस्तांतरित करता येतील. SWAYAM. AICTE ने 2016 मध्ये राजपत्र अधिसूचना देखील जारी केली आहे, आणि त्यानंतर क्रेडिट हस्तांतरणासाठी या अभ्यासक्रमांचा अवलंब केला आहे.

वर्तमान SWAYAM हे व्यासपीठ शिक्षण मंत्रालय आणि NPTEL, IIT मद्रास यांनी Google Inc. आणि Persistent Systems Ltd च्या मदतीने विकसित केले आहे.

Conclusion

Education Portal: SWAYAM Free Online Education, इयत्ता 9 वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व अभ्यासक्रम तुम्हाला कधीही, कुठेही प्रवेश करता येतो या लेखात आपण SWAYAM या Free ऑनलाईन Education Portal बद्दल माहिती पहिली आहे. आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top