Mahabocw Payment receipt: Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची

Mahabocw Payment receipt: Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ यांच्या कडून बांधकाम कामगारांची नोंदणी करून घेतली जाते, आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या हिताच्या योजना मंडळाकडून चालविल्या जातात. देशात असंघटीत कामगार म्हणून बांधकाम कामगार ओळखले जातात. सगळ्यात जास्त संख्या आज बांधकाम कामगारांची आपल्याला पाहायला मिळते. बांधकाम कामगारांचे अस्थाई स्वरूपाचे रोजगार असते. रोजगाराच्या शोधात ते कोण्याही एक ठिकाणी स्थाईक होऊ शकत नाहीत. त्यांना सतत कामाच्या शोधात जागा बदलत राहावे लागते. अशा अस्थाई स्वरूपाच्या रोजगार मिळविणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी शासन कामगार मंडळाकडून अनेक सामाजिक, आर्थिक हिताच्या योजना राबवीत असते. नोंदणी केल्या नंतर इतर लाभाच्या योजनांसाठी आवश्यक असलेली पेमेंट पावती कशी काढायची या बद्दल या लेखात आपण जाणून घेणार आहोत.Mahabocw Payment receipt: Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची

बांधकाम कामगार नोंदणी

शासनाच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आपली कामगार म्हणून नोंदणी Mahabocw.in या वेबसाइट वर जावून करावी लागेल. या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी केल्या नंतर मंडळाकडून तुम्हाला 14 अंकी ओळख क्रमांक दिल जातो. या ओळख क्रमांकाच्या साह्याने तुम्ही कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेवू शकता. नोंदणीसाठी तुमच्या कडे तुमचे आधार, मोबाइल नंबर, बँकेचे पासबूक, आणि 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे ग्रामपंचायत/नगरपंचयात किंवा नगरपालिका यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

✅👉🏻 BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा

बांधकाम कामगार नोंदणी फिस

महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार नोंदणी फिस फक्त 1  रु.  (एक रुपया) केली आहे. अतिशय अल्प फिस मध्ये तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता. बांधकाम कामगार नोंदणी फिस ही ऑनलाइन भरावी लागते. mahabocw  या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या मोबाइल पेमेंट App द्वारे भरू शकता. सदरील बांधकाम कामगार नोंदणी फिस भरल्या नंतर तुम्हाला भरलेल्या नोंदणी फिस ची पावती मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाते.

✅👉🏻  www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

Mahabocw Payment receipt: Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला पुढील योजनांचा लाभ घेण्यासाठी पेमेंट पावतीची आवश्यकता असते. हि पावती तुम्हाला कधीही काढता येते, पावतीची प्रिंट मारून तुम्ही ती तुमच्या योजनेच्या फॉर्मला जोडू शकता.

Mahabocw Payment receipt कशी काढ्याची ते आपण पाहू. सर्वप्रथम तुम्हाला कामगार कल्याणकारी मंडळाच्या Mahabocw.in या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्या नंतर Construction Worker:Profile Login या पर्यायाला निवडावे लागेल, हा पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला पहिल्या रकान्यात तुमचा आधार नंबर आणि दुसऱ्या रकान्यात तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल ती तुम्हाला पुढील रकान्यात टाकायची आहे.

OTP भरल्या नंतर तुमची प्रोफाइल Open होईल. प्रोफाइल Open झाल्यावर त्यावर तुमचे सर्व डीटीएल असेल.

Applicant’s Name:
Mobile:
DOB:
Age(current):
Gender:
Marital Status:
Aadhar Number:
Category:
Acknowledgement Number:
Application Status:
Registration Number:
Registration Status:
Registration Date:
Next Renewal Date:
या नंतर खालच्या साईडला तुमच्या कागदपत्रांचे डीटीएल असेल
Other Details
Documents
Residential Address
Family Details
Bank Details ( Carent)
90 Days Work Certificate Details (Letest)
Renewals
Claims
Payment Details

एवढे पर्याय असतील त्या मधून तुम्हाला Payment Details हा पर्याय निवडायचा आहे. या पर्यायाला क्लिक करताच तुमच्या समोर Print Cash Receipt आणि Print Renewal Receipt हे दोन पर्याय दिसतील यांना टच करताच तुमची Payment receipt/ पेमेंट पावती दिसेल. ती तुम्ही Mahabocw Payment receipt/Mahabocw पेमेंट पावतीची प्रिंट काढू शकता.

✅👉🏻 बांधकाम कामगार योजना फायदे

Conclusion

Mahabocw Payment receipt: Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची या लेखामध्ये आपण बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली Payment receipt/ पेमेंट पावती कशी काढायची या बद्दल माहिती पहिली. बांधकाम कामगाराच्या विविध योजना कामगार मंडळाकडून राबविल्या जातात. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top