महाराष्ट्र ट्रॅफिक चलान: तुमच्या वाहनाचे ई-चलान कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत

maharashtra traffic challan:- प्रत्येक राज्याच्या traffic नियमामध्ये RTO किंवा traffic क्यामेर्यावरून वाहनावर मारलेला चलान भरावाच लागतो. रोडवर वाहन चालवत असतांना कधी कधी अनवधानाने किंवा घाई गरबडीत आपल्या कडून ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन होते, परिणामी वाहनावर चालान मारले जाते. हे चलान ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. ऑफलाईन मारलेली पावती आपल्याला जाग्यावर किंवा ऑफिसला जावून भरावे लागते. पण ऑनलाईन मारलेले ई-चलान विना पावती असल्याने ते किती मारले हे माहित नसते, एखाद्यावेळेस ऑनलाईन ई-चलान चे मॅसेज येत नाही. मग आपल्या वाहनावर ई-चलान आहे का नाही हे कसे चेक करायचे आणि ऑनलाईन मारलेले ई-चलान कुठे भरायचे हे आपण maharashtra traffic challan या लेखात पाहणार आहोत.maharashtra traffic challan

ई-चालान महाराष्ट्र /maharashtra traffic challan

ई-चालान शासनाची एक आधुनिक प्रणाली असून हे maharashtra traffic challan भरण्यासाठी RTO कार्यालयाला खेटे मारण्याची गरज नाही. वाहन चालवत असतांना ट्रॅफिक नियमांचे भंग झाल्यास ऑनलाईन सिस्टम द्वारे traffic challan मारले जाते, त्यालाच ई-चलान असे म्हणतात. वाहनावर नियमभंग झाल्यास मारलेले दंड ई-चलान सिस्टम मध्ये घरबसल्या ऑनलाईन तपासता येते आणि भारता पण येते. ते कसे चेक करता येते ते आपण पुढे पाहणार आहोत.

भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटद्वारे चेक करा वाहनावरील ई-चालान/ e-status

वाहन चालवत असतांना जर अनवधानाने एखद्या वेळेस ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन झाल्यास नवीन ऑनलाईन प्रणाली नुसार ई-चलान (maharashtra traffic challan) मारले जाते. आपल्या वाहनावर ई-चलान मार्फत किती दंड मारलेला आहे, हे आपल्याला भारत सरकारच्या  parivahan e challan  वेबसाईट वर जावून चेक करता येते. ते कसे चेक करायचे ते आपण खाली पाहू.

Challan Number:-

  • सर्वप्रथम भारत सरकारच्या parivahan e challan vebpage या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल, वेबसाईट वर आल्या नंतर डाव्या बाजूला असणाऱ्या ‘ऑनलाईन सर्विसेस’ मध्ये e-challan या पर्यायावर जावे लागेल.
  • नवीन पेज वर डाव्या बाजूला असणाऱ्या ‘चेक ऑनलाईन सर्विसेस’ या मधून ‘चेक चलान स्टेटस’ या पर्यायाला क्लिक करा.
  • ओपन होणार्या नवीन पेजवर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये विचारलेली माहिती भरायची आहे.
  • तुमच्याकडे जर चलान नंबर असेल तर पहिल्या ‘चलान नंबर’ या पर्यायाला टिक करा आणि खाली चालान नंबर भरून त्या खालील कॅप्चा भरून ‘गेट डिटीयल’ वर क्लिक करा तुमच्या वाहनावर असणारा दंड (traffic challan) ई-चलान संपूर्ण माहिती तुमच्या समोर दिसेल.

Vehicle Number:-

  • तुमच्याकडे traffic challan नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या वाहनाच्या नंबर टाकून वाहनावरील दंड चेक करू शकता, त्यासाठी समोर दिसणाऱ्या पेज वरील दुसरा पर्याय ‘व्हेईकल नंबर’ या पर्यायाल टिक करा आणि खाली तुमच्या वाहनाचा पासिंग (नंबर प्लेट वरील) नंबर टाका. त्या खालील कॅप्चा कोड भरून ‘गेट डिटीयल’ वर क्लिक करा.
  • ‘गेट डिटीयल’ वर क्लिक करताच तुमच्या वाहनावरील (traffic challan) ई-चलान ची माहिती तुम्ही बघू शकता.

DL Number:-

  • ड्रायविंग लायसेन्स द्वारे हि तुम्ही तुमच्या वाहनावर असलेले traffic challan चेक करू शकता.
  • ड्रायविंग लायसेन्स द्वारे traffic challan चेक करण्यासाठी ‘डी एल नंबर’ या तिसऱ्या पर्यायाला टिक करा.
  • त्या खाली तुमच्या कड्या असणाऱ्या ड्रायविंग लायसेन्स नंबर टाका आणि खालील कॅप्चा कोड टाकून ‘गेट डिटीयल’ वर क्लिक करा, तुमच्या समोर तुमच्या वाहणार असलेले ई-चलान दिसतील.

अशा पद्धतीने भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावून maharashtra traffic challan आपल्याला चेक करता येते.

Maharashtra Traffic Challan Online Pay

महाराष्ट्रात traffic challan भरण्यासाठी भारत सरकारची parivahan वेबसाईट तसेच महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र पोलीस वेबसाईट अशा दोन्ही वेबसाईट वरून maharashtra traffic challan भारता येवू शकते. दोन्ही वेबसाईट विषयी माहिती आपण खाली पाहणार आहोत.

भारत सरकारच्या परिवहन वेबसाईट वरून चालान कसे भरायचे

वाहनावर नियमभंगमुळे मारलेला दंड ट्रॅफिक चलान ( maharashtra traffic challan) हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भारता येते. कार्यालयाला जावून ट्रॅफिक चलान भारता येते तसेच ऑनलाईन घरबसल्या ही भारता येते. ऑनलाईन चलान कसे भरायचे ते आपण पाहू.

भारत सरकारच्या parivahan वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन चलान भारता येते, तुम्हाला वेबसाईट वर e-challan या पेज वर जाऊन भारता येयील.

  • सर्वप्रथम वाहनाला मारलेले e-challan चेक जे पेज ओपेन करतो त्याच पेज वरून आपण चालान भरू शकतो. 
  • भारत सरकारच्या parivahan e challan vebpage या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल, वेबसाईट वर आल्या नंतर डाव्या बाजूला असणाऱ्या ‘ऑनलाईन सर्विसेस’ मध्ये e-challan या पर्यायावर जावे लागेल.
  • नवीन पेज वर डाव्या बाजूला असणाऱ्या ‘चेक ऑनलाईन सर्विसेस’ या मधून ‘चेक चालान स्टेटस’ या पर्यायाला क्लिक करा.
  • ओपन होणार्या नवीन पेजवर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये विचारलेली माहिती भरायची आहे.
  • ‘चालान नंबर’/’व्हेईकल नंबर’/’डी एल नंबर’ या तिन्ही पैकी कोणतेही एका पर्यायावर टिक करा, त्या खाली तिन्ही पैकी एक नंबर भरून त्या खालील कॅप्चा कोड भरून ‘गेट डिटीयल’ या बटनावर क्लिक करा.
  • समोर ओपेन होणाऱ्या ई-चलान पेकी जे तुम्हला भरायचे आहे, त्या वर क्लिक करून पेमेंट करा. पेमेंट झाल्या नंतर पेमेंट झाल्याचा मॅसेज येई त्या बरोबरच एक आयडी मिळेल.

महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र शासनाने ई-चालान संबधी एक स्वतंत्र वेबसाईट निर्माण केलेली आहे, या वेबसाईट द्वारे तुम्ही तुमचे ऑनलाईन maharashtra traffic challan भरू शकता त्याच बरोबर वाहनावरील मारलेल्या दंड विषयी तक्रार सुधा करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत mahatrafficechallan.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल.
  • वेबसाईट वर आल्या नंतर समोर दिसणाऱ्या पेजवर दोन पर्याया मधून एक पर्याय निवडून e-challan भरू शकता.
  • Vehicle NO. या पर्यायाला टिक करून खालील पहिल्या बॉक्स मध्ये वाहनाचा पासिंग नंबर टाकायचा आहे. तर त्या खालील बॉक्स मध्ये वाहनाच्या चासिस नंबर मधील शेवटची चार अंक टाकायचे आहेत.
  • त्या नंतर कॅप्चा टिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • सबमिट बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल, त्यावर वाहनावर असलेले challan दिसतील त्यावर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करता येयील. पेमेंट झाल्यावर तुम्हाला पेमेंट झाल्याची आयडी मिळेल.

अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या mahatrafficechallan.gov.in या वेबसाईट वर जावून e-challan चे पेमेंट करू शकता.

ई-चलान विरुद्ध तक्रार महाराष्ट्र राज्य

  • महाराष्ट्र शासनाच्या mahatrafficechallan.gov.in ही वेबसाईट टाईप करताच E-Challan Grievance याच्या वरती क्लिक करा.
  • वेब पेज ओपन होताच दिसणाऱ्या दोन पर्याया मधून पहिल्या पर्यायाला क्लिक करा.
  • नवीन वेब पेज वर पहिल्या बॉक्स मध्ये तुमचा चालान नंबर टाका, त्या नंतर मोबाईल नंबर, e mail id, तक्रारीचे कारण निवडा, वाहनाचा पासिंग नंबर टाका, वाहनाच्या चासिस नंबर मधील शेवटची चार अंक टाका आणि कॅप्चा टिक करून सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • सबमिट बटनावर क्लिक करताच तुमची तक्रार नोंदविली जाईल, तसा रिप्लाय तुम्हाला येईल.

ई-चलान विरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढील लिंक वर जा ई-चलान विरुद्ध तक्रार महाराष्ट्र राज्य

पावती विरुद्ध तक्रार अर्ज

रोडवर वाहन चालवीत असतांना वाहनाला दंड/ पावती मारण्यात आला आणि मात्र दुसऱ्याच वाहनाच्या नंबर वर ती दंड पावती भरण्यात आली तर त्या विरुद्ध शासनाच्या वेबसाईट वर जावून तक्रार करता येते. महाराष्ट्र शासनाच्या mahatrafficechallan.gov.in या वेबसाईट वरती आल्या नंतर E-Challan Grievance मध्ये दोन नंबर च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

  • नवीन वेब पेजवर मारलेल्या चुकीच्या पावतीचा नंबर भरायचा आहे.
  • चीकीने मारलेल्या पावतीची रक्कम राकायाची आहे.
  • मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • e mail id टाकायची आहे.
  • ज्या वाहनावर चुकून दंड पावती भरण्यात आली त्या वाहनाचा पासिंग नंबर टाकायचा आहे.
  • नागरिकाच्या स्वतः च्या वाहनाचा नंबर टाकायचा आहे.
  • नागर्काने स्वतः च्या वाहनाच्या चासिस नंबर चे शेवाचे चार अंक भरायचे आहे.
  • कॅप्चा टिक टिक करून सबमिट बटनावर टिक करायचे आहे.

अशा पद्धतीने तुमची तक्रार नोंदविली जाईल, तसा रिप्लाय तुम्हाला मिळेल.

वरील प्रोसेस नुसार जर भरलेल्या ई-चलान ची पावतीसाठी तक्रार करता येते. पावतीसाठी तक्रार अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर जा पावती न मिळाल्याची तक्रार करा 

Maharashtra Traffic Police App/ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ट्रॅफिक अँप

e challan App
e challan app

महाराष्ट्र शासनाने ट्रॅफिक विषयीच्या सर्वसेवा शासनाच्या अधिकृत Maha Trafficapp वर उपलब्ध करून दिल्या आहेत. या e challan app च्या मधेमातून वाहन मालकाला वाहनाचे maharashtra traffic challan ऑनलाईन e challan app च्या साह्याने घर बसल्या भारता येतात. शिवाय चलान विषयीची तक्रार आणि इतर सुविधा ही सदरील मोबाईल app च्या साह्याने मिळतात.

  • App डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर वर जाऊन Maha Trafficapp असे टाईप करावे लागेल.
  • समोर दिसणाऱ्या इतर अँप मधून महाराष्ट्र शासनाचे Traffic Police हेच e challan app डाउनलोड करायचे आहे.

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत Maha Trafficapp e challan app डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर जा https://play.google.com/store/apps/details?id=com.sparken.maharashtra.mtpkotlinapp

सारांश

महाराष्ट्र ट्रॅफिक चलान: तुमच्या वाहनाचे ई-चलान कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत या लेखात आपण maharashtra traffic challan हे भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट वर जावून कसे चेक करायचे आणि कसे भरायचे या बद्दल संपूर्ण माहिती पहिली. महाराष्ट्र शासनानाने वाहना विषयीच्या सर्व सेवा सुविधा Maha Trafficapp वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. e challan app मधेमातून वाहनाचे e challan चेक करता येते तसेच भारता येते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
हे ही वाचा :-

अशीच नवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top