नमो शेतकरी योजना स्टेटस: नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते पडले चेक करा

नमो शेतकरी योजना स्टेटस चेक करा:- केंद्र सरकारच्या ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’  सुरु केलेली आहे. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने प्रमाणेच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना रु. 2000 हजार मानधन देते. या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार असे असे मिळून रु. 4000 हजार रुपये मानधन स्वरूपात मिळतात. नमो शेतकरी योजना स्टेटस

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ( NSMMY )

केंद्राने सुरु केलेल्या ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरु केलेली आहे. या शेतकरी योजनेतून शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक  मदत करत आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेती आणि शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता वाटावी म्हणून शासन सदरील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकत आहे. यामधून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा उद्देश शासनाचा आहे. या योजनेतून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाबरोबरच अतिरिक्त रु. 2000 शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करते.

नमो शेतकरी योजना स्टेटस

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या NSMMY म्हणजे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’  अंतर्गत लाभार्थ्याला आपल्याला मिळत असलेल्या हप्त्याचे स्टेटस पाहता येते. आपला हप्ता पडला किंवा नाही हे आपण स्वतः चेक करू शकतो. ते कसे चेक करायचे ते आपण पाहणार आहोत.

नमो शेतकरी योजना स्टेटस कसे चेक करायचे

  • NSMMY या योजने अंतर्गत मिळणार हप्ता चेक करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला MAHADBT NSMMY  या पोर्टल वरती जावे लागेल.
  • पोर्टल वर आल्या नंतर समोर दिसणाऱ्या पेजवर Beneificiary Status या पर्यायावरती जायचे आहे.
  • Beneificiary Status या पेजवर तुम्ही तुमच्या Registration number किंवा Mobile number टाकायचा आहे, आणि त्या खालील कॅप्चा कोड टाकून Verify OTP या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • आलेला OTP भरून Get data वरती क्लिक करायचे आहे.
  • Get data वरती क्लिक करताच तुमच्या समोर NSMMY चे स्टेटस ओपन होईल.

या मध्ये तुम्हाला आत्ता पर्यंत किती हप्ते मिळाले याची संपूर्ण डीटीएल असेल. तसेच तुमचे रजिस्ट्रेशन कधी झाले ती तारीख पण तुम्ही पाहू शकता. आणि याची प्रिंट पण काढू शकता.

NSMMY Registration number

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ मध्ये तुमची नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक रेजिट्रेशन नंबर मिळतो. हा NSMMY Number तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करायला उपयोगी पडतो. हा नंबर लाभार्थी शेतकऱ्याचा ओळख क्रमांक असतो. शासनाने दिलेला ऑनलाईन लाभार्थी क्रमांक असतो.

Registration number कसा चेक करायचा

  • सर्वप्रथम MAHADBT NSMMY या बेबसाईवर आल्या नंतर समोर दिसणाऱ्या पेजवर Beneificiary Status या पर्यायावरती जायचे आहे.
  • Beneificiary Status वरती आल्या नंतर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या हिरव्या रंगातील Know your Registration Number वरती क्लिक करायचे आहे.
  • दिसणाऱ्या रकान्यात तुमचा Mobile number किंवा Aadhar number टाकायचा आहे.
  • तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल किंवा आधार नंबर टाकायचा आहे.
  • त्या नंतर त्या खालील कॅप्चा टाकून Get OTP वरती क्लिक करायचे आहे.
  • आलेला OTP आणि पुन्हा कॅप्चा टाकून Get Data वरती क्लिक करायचे आहे.
  • Get Data वरती क्लिक करताच तुमच्या समोर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचे पूर्ण नाव ओपन होईल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा NSMMY Registration number मिळवू शकता.

Conclusion

नमो शेतकरी योजना स्टेटस: नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते पडले चेक करा या लेखात आपण नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिला रु. 2000 हजार हप्ता ऑनलाईन कसा चेक करायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली. या योजने अंतर्गत लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांना MAHADBT NSMMY या वेबसाईटवर जाऊन आपल्याला मिळणाऱ्या निधीचे किती हप्ते पडले या बद्दल सविस्तर माहिती घेता येते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

अशाच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

हे हि वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top