Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

आज कुठलेही वाहन विकत ग्यायाचे असेल तर त्याचे insurance भरावेच लागते, त्या बदल्यात कंपनी आपल्याला आणि आपल्या वाहनाला विम्याचे संरक्षण देते. गाडीला कुठला अपघात झाला किंवा काही हानी झाली तर त्याचा मोबदला कंपनी आपण भरलेल्या विम्याच्या मोबदल्यात देते. दोन चाकी पासून अगदी अवजड वाहणा पर्यंत insurance असणे बंधन कारक आहे. त्याशिवाय तुमची गाडी रोडवर चालण्यास पात्र नाही. वाहनाच्या विमा करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, प्रत्येक कंपनीचे नियम आणि प्रीमियम काही अंशी वेगळे आहेत. विमा कंपनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे विम्याचे संरक्षण देते. आपण आपल्या वाहनाच्या भरलेल्या विम्याविषयी Parivahan Insurance Check कसे करायचे या बद्दल जाणून घेणार आहोत.Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

वाहन विमा पोलीसीचे फायदे

  • आर्थिक सुरक्षेची हमी:- insurance आपल्याला अर्थीक सुरक्षेची हमी देते. खरेदी केलेल्या वाहनाचा एखाद अपघात झाला किंवा करीला गेल्यास झालेल्या नुकसानाची भरपाई आपल्याला कंपनी विम्याच्या माध्येमातून करून देते. त्यामुळे आपले होणारे आर्थिक नुकसान भरून निघते.
  • तृतीय पक्ष नुकसान संरक्षण :- आपल्या वाहनाने अपघातात एखाद्या दुसर्या वाहनाचे नुकसान झाले, तर अशा वेळेस कंपनी त्या वाहनाची झालेली नुकसान भरपाई करून देते, त्यमुळे आपल्यावर पडणार्या आर्थिक भरापासून आपण वाचतो.
  • आर्थिक सुरक्षेमुळे मानसिक समाधान :-  विमा काढलेला असल्यामुळ अनपेक्षित होणाऱ्या दुर्घटनेच्या मानसिक ताणताणाव पासून मुक्तता मिळते, विमा असल्यामुळे घडणाऱ्या दुर्घटनेत आर्थिक नुकसान पासून आपण वाचू शकतो या विचाराने मनाला सुरक्षितता आणि समाधान वाटते.

✅👉🏻 Maharashtra Voter List PDF: महाराष्ट्र मतदार यादी कशी चेक करायची

परिवहन सेवा पोर्टल वरील Online सेवा

MINISTRY OF ROAD TRANSPORT & HIGHWAYS या भारत सरकारच्या मंत्रालय मार्फत चालविल्या जाणाऱ्या Parivahan Sewa पोर्टल द्वारे वाहनाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

  • परमीट विषयी सेवा
  • ड्रायविंग लाइसेंन्स विषयी सेवा
  • फॅन्सी नंबर बुकिंग
  • NR सर्विसेस e- चालान
  • वाहन फिटनेस टेस्ट
  • चेक पोस्ट टॅक्स
  • पेड NR सेवा
  • होमोलोगेशन
  • नॅशनल परमिट ऍथॉराईझेशन
  • AITP ऍथॉराईझेशन
  • CNG मेकर
  • SLD मेकर
  • PUCC
  • TRADE प्रमाणपत्र
  • VAHAN GREEN SEWA
  • Vehicle Scrapping
  • जुने नोंदणीकृत वाहन डिलरशिप
  • वाहन स्क्रॅपिंग

इत्यादी सेवा परिवहन सेवा या पोर्टल मार्फत राबविल्या जातात. ग्राहकांच्या सेवेसाठी या सेवा राबविल्या जातात. या पोर्टल मार्फत वाहनाला रोडवर चालविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या सर्व सेवा या पोरातलं मार्फत देण्यात येतात.

✅👉🏻Annasaheb Patil Loan Apply Online: अण्णासाहेब पाटील ऑनलाईन कर्ज नोंदणी

 परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

आपल्या वाहनाचे केलेले Insurance ( विमा ) चालू आहे, का संपला याची माहिती असणे आवश्यक असते. कधी कधी आपण काढलेला वाहनाचा विमा किती तारखेपर्यंत आहे हे आपण विसरतो. मग हि माहिती घ्यायची कशी ? ते आपण पाहणार आहोत, तुमचा विमा परिवहन पोर्टलवर चेक करण्यासाठी, प्रथमतः तुम्हाला परिवहन पोर्टलवर login id बनवावी लागेल, आणि बनवलेल्या login id चा वापर करून Parivahan Insurance Check करता येईल. login id कशी बनवायची हे अगोदर आपण पाहू.

parivahan login

आपल्या वाहनासाठी घेतलेला विमा ( Insurance ) किती तारखेला संपणार हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या सड़क परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांनी तयार केलेल्या परिवहन सेवा या Online पोर्टलवर जावे लागेल. Parivahan Sewa या पोर्टलवर आल्या नंतर तुम्हाला तुमचे account बनवावे लागेल, ते कशे बनवायचे ते आपण पाहू.

Parivahan Sewa पोर्टल https://vahan.parivahan.gov.in Open केल्या नंतर Informational Services या मेनू बार मधील पर्यायावर जावे लागेल. Informational Services या पर्यायावर गेल्या नंतर त्या मध्ये दिसणाऱ्या इतर पर्यायांमधून Know Your Vehicle Details हा पर्याय निवडायचा आहे. या पर्यायाला क्लिक करताच एक नवीन पेज Open होईल. Citizon Login म्हणून असणाऱ्या या पेजवर दिसणाऱ्या रकान्याच्या शेवटी Create account ला क्लिक करायचे आहे.

Create account ला क्लिक करताच तुमच्या समोर NEW USER REGSTRATION नावाने नवीन पेज Open होईल. या पेजवर तुम्हाला दिलेल्या वरील रकान्यात तुमचा mobile no. त्या खालील रकान्यात Email id टाकून खालील रकान्यात Verification Code टाकून Genrate otp वर क्लिक करायचे आहे.

Genrate otp या बटनावर क्लिक करताच Open होणाऱ्या बॉक्स मध्ये तुमच्या मोबाईल नंबरवर आलेली otp टाकायची आहे,आणि Verify बटनावर क्लिक करायचे आहे.

आलेला otp टाकून Verify बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर नवीन बॉक्स open होईल, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे नाव-Name टाकायचे आहे, आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये Password तयार करून टाकायचा आहे. तयार केलेला किंवा साईटने दिलेला Password टाकून तो पुन्हा Cofirm Password मध्ये टाकायचा आहे. त्या नंतर शेवटी असलेल्या Save बटनावर क्लिक करून Save करायचे आहे.

नाव आणि Password टाकून सेव्ह केल्या नंतर तुम्हाला THANK YOU आणि Citizen User Hasbeen Created Succesfully म्हणून मॅसेस दिसेल. त्या नंतर त्या खालील Back To Vehicle Search ला टच करून तुम्ही पुन्हा Citizen Login या पेजवर परत याल.Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

Citizen Login या पेज वर परत आल्या नंतर इथे तुम्हाला पहिल्या रकान्यात mobile no. आणि दुसऱ्या रकान्यात Verification Code टाकायचा आहे.आणि शेवटी असणाऱ्या Next या बटनावर क्लिक करायचे आहे.

Next वर क्लिक केल्या नंतर पुढील बॉक्स मध्ये तुमचा Mobile Number-Password येईल, पुढे Continue क्लिक करा आणि त्या नंतर आलेला otp पुढील रकान्यात भरून Verify वर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमची वेबसाईटवरील लॉगिन पूर्ण होईल, आणि तुम्ही login id वापरून पुढील Parivahan Insurance Check ची प्रोसेस करू शकाल.

✅👉🏻 मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र : how to download voter id online

Parivahan Insurance Check: कसे करायचे

आपल्या वाहनाचे Insurance Check करण्यासाठी आपल्याला Parivahan पोर्टलवर जावे लागेल. आणि पोर्टल वरील पुढील प्रोसेस पूर्ण करण्यासाठी parivahan login करणे आवश्यक असते, ते कशे login करायचे ते आपण पहिले. आता आपण तयार केलेली login id वापरून आपण आपल्या वाहनाचे Insurance Check करू शकतो. Insurance Check कशे करायचे ते आपण पुढे स्टेप बाय स्टेप पाहू.

Insurance Check:-

आपल्या वाहनाचे Insurance Check करण्यासाठी Parivahan या पोर्टलवर गेल्या नंतर CITIZEN LOGIN या पेजवर दिलेल्या बॉक्स मध्ये तुम्हाला Mobile Number आणि Verification Code टाकून Next वर क्लिक करायचे आहे.

Next वर क्लिक केल्या नंतर येणाऱ्या पुढील पेजवरील बॉक्स मध्ये तुमचा login केलेला Mobile Number आणि Password आपोआप येईल. त्यानंतर त्या खालील Continue बटनावर क्लिक करायचे आहे.

Continue बटनावर क्लिक करताच तुमच्या login साठी वापरलेल्या Mobile Number वर OTP येईल, ती पुढील बॉक्स मध्ये भरून Verify या बटनावर क्लिक करायचे आहे.

VEHICLE REGISTRATION STATUS म्हणून नवीन सुरज open होईल त्या मध्ये तुम्हाला तुमच्या वाहनाचा RTO पासिंग नंबर टाकायचा आहे, आणि दिलेला Verification Code टाकून त्या खालील Vahan Search बटनावर क्लिक करायचे आहे. Vahan Search  बटनावर क्लिक करताच तुमच्या वाहनाचे RC STATUS तुमच्या समोर Open होईल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वाहनाचे Parivahan पोर्टलवर Insurance Check करू शकता.

Conclusion

Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा या लेखा मध्ये आपण वाहन विमा पोलीसीचे फायदे, परिवहन सेवा पोर्टल वरील Online सेवा, parivahan login कसे करायचे आणि वाहनाचे Parivahan पोर्टलवर Insurance Check कसे करायचे या बद्दल परिपूर्ण माहिती पहिली आहे. या लेखा द्वारे तुम्हाला तुमच्या वाहनाचे Insurance Check करायला नक्कीच मदत होईल. माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

1 thought on “Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा”

  1. Pingback: Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top