www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल :- शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अनेक योजना या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी राबविल्या जातात. सामाजिक सुरक्षा योजना, आरोग्यविषयक योजना, शैक्षणिक योजना आणि आर्थिक योजना या योजनांमधून कामगाराचा सामाजिक स्तर उंचावण्याचा हेतू शासनाचा आहे. भारतात असंघटित कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये बांधकाम कामगार येतात. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची संख्या जास्त आहे. मजुरांना समाजातील इतर घटकांबरोबर आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामगार मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळातून कामगारांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केल्याच्या नंतर तुम्ही सदरील योजनेचा लाभ घेऊ शकता. कामगार मंडळामध्ये केलेली नोंदणी हि तुम्हाला प्रत्येक वर्षी Renew करावी लागते, त्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत.
माझी नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/The Best Tips For Job
www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल
कामगार मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या लाभार्थ्याला दरवर्षी आपली नोंदणी renew करावी लागते. कामगार म्हणून नोंदणी करत असताना दिलेल्या कागदपत्रांमधील 90 दिवस काम केल्याचे गुत्तेदाराचे/ग्रामसेवकाचे/महानगरपालिका अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र हे परत नव्याने renew करताना अपलोड करावे लागते. तुम्ही अजून बांधकाम कामगार आहात का हे बघण्यासाठी मंडळ तुम्हाला सदरील प्रमाणपत्र मागते.
Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा
Online Renewal कसे करायचे
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणाऱ्या कामगाराला प्रत्येक वर्षी मंडळाच्या साइटवर जावून आपले Registration Renew करावे लागते. चालू वर्ष 2025 पासून पोर्टलच्या नवीन अपडेटनुसार आता रिन्यू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी तुम्हाला नजीकच्या कामगार कल्याण कार्यालयात जाऊन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. कसे करायचे ते आपण पाहू.
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या वेबसाईटवर जावे लागेल. mahabocw.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्या नंतर इतर पर्यायांमधून Construction Worker Online Renewal या पर्यायाला निवडावे लागेल.
- Construction Worker Online Renewal हा पर्याय निवडल्यानंतर New Renewal आणि Update Renewal हे पर्याय दिसतील. नवीन Renew करणाऱ्या लाभार्थ्याला New Renewal हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर त्याखालील रकान्यात तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. Registration नंबर टाकल्या नंतर तुमच्या Registred मोबाईल नंबर वर एक OTP येईल. तो otp रकान्यात भरल्या नंतर तुमच्या समोर Online Renewal चे पेज open होईल.
- Online Renewal पेज open झाल्यावर तुम्हाला तुमची भरलेली माहिती दिसेल. पेजवरती आल्यानंतर अपलोड करत असलेल्या 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावरील जावक क्रमांक आणि जावक दिनांक हा पुढील दोन रकान्यात भरायचा आहे.
- त्या खालील रकान्यात 90 दिवसाचे प्रमाणपत्र गुत्तेदाराने किंवा ग्रामसेवकाने दिले असल्यास ते रकान्यात निवडायचे आहे.
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे अपलोड बटनावर क्लिक करून अपलोड करायचे आहे.
- खाली आल्यानंतर खालील रकान्यात कागदपत्रे पडताळणीसाठी तुमच्या जवळचे कामगार कल्याण कार्यालय निवडायचे आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेले कामगार कल्याण कार्यालय निवडू शकता.
- खाली दिसणाऱ्या निळ्या रंगाच्या बाणावर क्लिक करून कागदपत्रे पडताळणीची तारीख निवडायची आहे. या तारखेला कार्यालयात मूळ कागदपत्रांसह हजर व्हायचे आहे.
- कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुमचे Renewal पूर्ण होईल.
Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?
Construction Worker Online Renew कागदपत्रे
Online renewal करण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते कारण तुम्ही नोंदणी करताना सर्व कागदपत्रे दिलेली असतात. कामगार मंडळ तुमच्याकडून दर 12 महिन्याला renew करून घेते, कारण तुम्ही आज रोजी बांधकाम कामगार आहात किंवा तुम्ही बांधकाम मजूर म्हणून काम करत नाही, हे पाहण्यासाठी तुमच्याकडून Renewal करून घेतले जाते. Renewal करताना तुमच्याकडून कडून 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र घेतले जाते.
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र :
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत असताना महत्त्वाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार आहात याचे प्रमाणपत्र. तुम्ही वर्षातून कमीत कमी 90 दिवस तरी बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे, तेव्हाच तुम्ही बांधकाम कामगार म्हणून गृहीत धरले जातात. जर तुम्ही वर्षातून 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करत नसाल, तर तुम्हाला कामगार मंडळाची नोंदणी करता येणार नाही.
90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ज्या गुत्तेदाराकडे काम करत आहात त्यांच्याकडून आणि तुमच्या गावाचे ग्रामसेवक यांच्याकडून घ्यावे लागते. दोघांचे सही-शिक्के त्यावर असतात. Online renewal करताना तुम्हाला 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागते.
Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना
www mahabocw in renewal status/ ऑनलाईन रिनीवलची स्थिती तपासा
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्या नंतर तुम्हाला दरवर्षी Online Renewal करावे लागते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या www.mahabocw.in या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाइटवर गेल्या नंतर तुम्हाला दिसणाऱ्या पर्याय मधून Construction Worker: Profile Login या पर्यायाला निवडावे लागेल.
Construction Worker: Profile Login हा पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला समोरील रकान्यात तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. आधार नंबर व मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP येईल, ती तुम्हाला समोरील रकान्यात टाकायची आहे.
OTP भरल्या नंतर तुमच्या समोर तुमची Profile open होईल, त्या मध्ये Renewals ला क्लिक करा. क्लिक करताच तुम्हाला तुमचे renewal status दिसेल.
Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम
Conclusion
www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल या लेखा मध्ये आपण बांधकाम कामगार यांच्या Online Renewal कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपली कामगार नोंदणी ऑनलाइन रिन्यू करू शकता. (Online Renewal) ऑनलाइन रिन्यूवल करण्यासाठी तुम्हाला 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा.
हे ही वाचा :
- BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा
- बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना
- बांधकाम कामगार यादी: अशी चेक करा बांधकाम कामगार यादी
- Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती अशी तपासा
- बांधकाम कामगार योजना फायदे: Construction Worker Scheme Benefits
- बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: अशी करा कामगार नोंदणी
- Construction Workers Educational Welfare Scheme Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
- महाराष्ट्र कामगार नोंदणी: कामगार नोंदणी करा मोबाईलवरून वरून
- Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा
आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.